शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

कलंबिस्तजवळ एसटी बस उलटली, सुदैवाने जीवितहानी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2020 16:44 IST

सावंतवाडीहून वेर्ले येथे जाणारी एसटी बस वेर्ले गावातून परतून सावंतवाडीच्या दिशेने येत असताना अपघात झाला. कलंबिस्तजवळ वेर्ले सीमेलगत बस रस्ता सोडून बाहेर गेली आणि उलटली. यात सुदैैवाने कोणीही जखमी झाले नसले तरी एसटीचे मोठे नुकसान झाले आहे. या एसटीमध्ये चालक-वाहक असे मिळून सहा जण होते.

ठळक मुद्देकलंबिस्तजवळ एसटी बस उलटली, सुदैवाने जीवितहानी नाहीएसटी बसचे मोठे नुकसान

सावंतवाडी : सावंतवाडीहून वेर्ले येथे जाणारी एसटी बस वेर्ले गावातून परतून सावंतवाडीच्या दिशेने येत असताना अपघात झाला. कलंबिस्तजवळ वेर्ले सीमेलगत बस रस्ता सोडून बाहेर गेली आणि उलटली. यात सुदैैवाने कोणीही जखमी झाले नसले तरी एसटीचे मोठे नुकसान झाले आहे. या एसटीमध्ये चालक-वाहक असे मिळून सहा जण होते. हा अपघात सोमवारी दुपारी एकच्या सुमारास झाला.नेहमीप्रमाणे सावंंतवाडी एसटी आगाराची सकाळची बस वेर्लेच्या दिशेने गेली होती. तेथून ही बस परतत असतना वेर्ले सीमेलगत कलंबिस्त गावच्या हद्दीत बस रस्त्याच्या बाजूला गेली आणि सरळ शेतात उलटली. चालकाला समजण्याच्या आतच हा सर्व प्रकार घडला. त्यामुळे प्रवाशांनी आरडाओरड केली. यावेळी बसमध्ये चालक-वाहक यांच्यासह चार प्रवासी प्रवास करीत होते.हे सर्वजण बसमध्ये अडकले होते. त्याना नंतर बाहेर काढण्यात आले. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, एसटी बसचे मोठे नुकसान झाले आहे. अपघात झाल्याची माहिती समजताच वेर्ले सरपंच सुरेश राऊळ, उपसरपंच सुभाष राऊळ, सामाजिक कार्यकर्ते आनंद राऊळ, कलंबिस्त ग्रामस्थ तसेच वेर्ले ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. उशिरापर्यंत अपघाताबाबत पोलिसात नोंद झाली नव्हती. 

टॅग्स :Accidentअपघातsindhudurgसिंधुदुर्ग