शहरं
Join us  
Trending Stories
1
माळेगाव निकाल: पहिल्या फेरीअखेर अजित पवार गटाचे १७, तावरे गटाचे चार उमेदवार आघाडीवर
2
IND vs ENG: जसप्रीत बुमराह कुठले सामने खेळणार? कर्णधार शुबमन गिलने लगेचच दिलं उत्तर, म्हणाला- "मोठा ब्रेक..."
3
सोलापूरात विमान लँड होताच समोर आला कुत्रा; पायलटची उडाली भंबेरी, सुरक्षा रक्षकही धास्तावले
4
"मी पहिल्याच रात्री त्याला स्पर्श करू दिला असता, पण..."; सिताराचा दावा, पतीवर गंभीर आरोप
5
इराणच्या अणुकेंद्रांवरील हल्ला निष्फळ, अमेरिकेचा गोपनीय अहवाल फुटल्याने खळबळ, ट्रम्प म्हणाले... 
6
आणीबाणीला आज ५० वर्षे पूर्ण, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल!
7
भारताचा चीनवर पलटवार, दिला झटका; ६ उत्पादनांवर लावलं अँटी डम्पिंग शुल्क, का घेतला निर्णय?
8
अभिनंदन यांना पकडणारा पाकिस्तानी ऑफिसर ठार; कोणी केली पाक जवानाची हत्या?
9
युद्धाचा भारताला फटका! १ लाख टन बासमती तांदूळ बंदरात अडकला, २००० कोटींवर टांगती तलवार?
10
लेट पण थेट! सोनाली कुलकर्णीने फॉलो केला ट्रेंड, 'एक नंबर तुझी कंबर' वर थिरकली
11
Sambhajinagar Accident: संभाजीनगरात भीषण अपघात, भरधाव कार दुभाजकाला धडकून उलटली, ३ जण जागीच ठार!
12
IND vs ENG: केएल राहुलने शुभमन गिलकडून घेतली 'कॅप्टन्सी', पराभवापूर्वी सामन्यात अचानक काय घडलं?
13
Iran Israel Conflict: इराण इस्रायल प्रकरणी भारत शांत का? एक चूक आणि ५७,४४८ कोटी येतील धोक्यात
14
IND vs ENG: आधी चार झेल सोडले, नंतर हसत-खेळत केली 'तशी' कृती... यशस्वी जैस्वालवर संतापले नेटिझन्स
15
मदरशामध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत ठेवले अनैसर्गिक संबंध, व्हिडीओही काढले, सोशल मीडियावर शेअर केले, आरोपी अटकेत
16
पाकिस्तान सुधारणार नाही, राजौरीमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी; दहशतवादी गोळीबार करून पळून गेले
17
Pramod Kondhare: पाठीमागून आला आणि...; भाजप पदाधिकाऱ्याचं महिला पोलीसाशी गैरवर्तन, गुन्हा दाखल
18
जगभर: चिनी राष्ट्राध्यक्षांच्या ‘अज्ञात’ मुलीची ‘हेरगिरी’! शी जिनपिंग यांची मुलगी कोण?
19
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
20
दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा

सागरी पर्यटनासाठी स्पीड बोटी सज्ज

By admin | Updated: December 2, 2014 23:36 IST

चार वेगवेगळी पॅकेज : देवबाग ते सिंधुदुर्ग किल्ल्यापर्यंत सफर

संदीप बोडवे - मालवण -पर्यटकांना दर्जेदार सागरी पर्यटनाचा आनंद लुटता यावा यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने तारकर्ली स्कुबा डायव्हिंग सेंटर येथे तीन आधुनिक स्पीड बोटी उपलब्ध केल्या आहेत. या स्पीड बोटींमधून पर्यटकांना देवबाग संगम ते सिंधुदुर्ग किल्ल्यापर्यंतच्या समुद्रात मुक्त सागरी सफर करता येणार आहे. यासाठी चार वेगवेगळी पॅकेज असणार आहेत.जिल्ह्याच्या पर्यटनात किंबहुना देशाच्या पर्यटनात ‘नीलक्रांती’ घडविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने तारकर्ली येथे महत्वाकांक्षी स्कुबा डायव्हिंग सेंटर उभारले आहे. त्याच्याच जोडीला आता समुद्राच्या लाटांमध्ये स्पीड बोटीचा थरार अनुभवण्यासाठी तीन आधुनिक आणि आरामदायी स्पीड बोटी उपलब्ध करण्यात आल्या आहेत.अमेरिकन बनावटीच्या या स्पीड बोटींवर केमिकल टॉयलेट आहे. सुरक्षित डेकमुळे पर्यटकांना समुद्राचा थरार अगदी जवळून अनुभवता येणार आहे. या बोटींचा वेग ताशी १५ ते २० सागरी मैल असून २७० अश्वशक्तीचे इंजिन बसविण्यात आले आहे. मनोरंजनासाठी म्युझिक सिस्टिम तसेच सुरक्षिततेची साधने या बोटींवर उपलब्ध असणार आहेत. रस्त्यावरून चालणाऱ्या एखाद्या मर्सिडीज बेन्झप्रमाणेच या बोटी पर्यटकांना समुद्रातही आनंद देण्यास यशस्वी ठरणार आहेत असा विश्वास एमटीडीसीचे साहसी जलक्रीडा व्यवस्थापक सुबोध किनळेकर यांनी व्यक्त केला आहे.सागरी सफरीची चार पॅकेजदेवबाग संगम, तारकर्ली समुद्र आणि सिंधुदुर्ग किल्ल्यासभोवतालच्या समुद्रात वेगवेगळ्या चार प्रकारच्या सफरींद्वारे देशी-विदेशी पर्यटकांना सागरी पर्यटनाचा आनंद लुटता येणार आहे. यासाठी एमटीडीसीने प्रत्येकी १ तासाची चार विशेष पॅकेज तयार केली आहेत. गेम फिशिंग सफारी, सी फोर्ट सफारी, डॉल्फिन वॉच सफारी आणि सी सफर अशी ही चार पॅकेज असणार आहेत. पर्यटकांना आंतरराष्ट्रीय स्वरूपाच्या दर्जेदार सुविधा उपलब्ध करून दिल्या तरच मालवणच्या पर्यटनाचे नाव जगभर होईल असे सुबोध किनळेकर म्हणाले.स्कुबा डायव्हिंगसाठीही वापरतारकर्ली येथील स्कुबा डायव्हिंग सेंटरमध्ये अत्यंत दर्जेदार असे आंतरराष्ट्रीय निकषांनुसार स्कुबा डायव्हिंगचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामध्ये पोलीस, कस्टम, वनखाते, फायर ब्रिगेड आदी दलांना प्रशिक्षण देण्यात येणार असून याचा उपयोग आपत्ती व्यवस्थापनात होणार आहे. हे प्रशिक्षण थेट समुद्रात दिले जाणार असल्याने या स्पीड बोटींचा उपयोग होणार आहे.