शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

चाकरमान्यांसाठी गाड्यांची खास सोय, एसटीच्या सिंधुदुर्ग विभागाचे नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2020 12:08 IST

गणेशोत्सवासाठी मुंबईहून सिंधुदुर्गात आलेल्या चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी एसटीच्या सिंधुदुर्ग विभागाकडून ३० आॅगस्टपर्यंत ११७ गाड्या सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये २१ गाड्यांचे ग्रुप बुकींग आतापर्यंत झाले असल्याची माहिती एसटीच्या सूत्रांनी दिली.

ठळक मुद्देचाकरमान्यांसाठी गाड्यांची खास सोय, परतीच्या प्रवासासाठी सज्ज एसटीच्या सिंधुदुर्ग विभागाचे नियोजन

कणकवली : गणेशोत्सवासाठी मुंबईहून सिंधुदुर्गात आलेल्या चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी एसटीच्यासिंधुदुर्ग विभागाकडून ३० आॅगस्टपर्यंत ११७ गाड्या सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये २१ गाड्यांचे ग्रुप बुकींग आतापर्यंत झाले असल्याची माहिती एसटीच्या सूत्रांनी दिली.सिंधुदुर्गातील विविध बसस्थानकांवरून ठाणे, मुंबई सेंट्रल व बोरिवली आदी स्थानकांपर्यंत या जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. जिल्ह्यातून शुक्रवारी १५ जादा गाड्या चाकरमान्यांना घेऊन मुंबईच्या दिशेने रवाना झाल्या. एसटीच्या या व्यवस्थेमुळे चाकरमान्यांची चांगली सोय झाली आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवातही मुंबईवरून चाकरमान्यांना गावी येण्यासाठी एसटी महामंडळाकडून जादा गाड्या सोडण्यात आल्या होत्या. १२ आॅगस्टपर्यंत या जादा गाड्या सोडण्यात आल्या होत्या. या जादा गाड्यांचा अनेक चाकरमान्यांनी लाभ घेतला.आता या चाकरमान्यांना परत मुंबईला जाण्यासाठी सिंधुदुर्गातून जादा गाड्या सोडण्यास सुरुवात झाली आहे. ३० आॅगस्टपर्यंत या जादा गाड्या सोडल्या जाणार आहेत.कणकवली, सावंतवाडी, मालवण, देवगड, विजयदुर्ग, फोंडाघाट, वेंगुर्ला, कुडाळ आदी बसस्थानकांवरून या गाड्या मुंबईला सोडण्यात येत आहेत. एसटीच्या गाडीमध्ये २२ प्रवाशांना घेऊन या गाड्या सोडण्यात येत आहेत. या गाड्यांमधील प्रवाशांकडून सर्व नियमांचे पालन होत आहे.चाकरमान्यांच्या सोयीसाठी जिल्ह्यातील विविध बसस्थानकांवरून ९६ गाड्या तर ग्रुप बुकींगच्या २१ गाड्या सोडण्यात येणार आहेत. दरम्यान, प्रवाशांनी मागणी केल्यास त्यांच्या गावातून ग्रुप बुकींगच्या माध्यमातून एसटीच्या गाडीची मुंबई येथे जाण्यासाठी सोय उपलब्ध केली जाणार आहे.गाड्या उपलब्धसिंधुदुर्गातील बसस्थानकांवरून थेट प्रवाशांना घेऊन या गाड्या मुंबईला जाणार आहेत. त्यामुळे अद्यापही गाड्यांचे प्रवाशांकडून आरक्षण केले जात आहे. तसेच ग्रुप बुकींगसाठीही गाड्या उपलब्ध केल्या जात आहेत. चाकरमान्यांना मुंबईला परत जाणे सोयीचे व्हावे यासाठी एसटी महामंडळाकडून या जादा गाड्या सोडण्यात येत आहेत. 

टॅग्स :state transportएसटीsindhudurgसिंधुदुर्ग