शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
5
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
6
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
7
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
8
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
9
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
10
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
11
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
12
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
13
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
14
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
15
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
16
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
17
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
18
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
19
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
20
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?

नाताळ, नववर्षानिमित्त धावणार विशेष रेल्वे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2019 11:39 AM

नाताळ आणि नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर कोकण व गोव्यात जाणाऱ्यांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाड्या धावणार आहेत. या गाड्या लोकमान्य टिळक टर्मिनस ते सावंतवाडी रोड, थिवीम, करमाळी आणि एर्नाकुलम मार्गावर धावणार आहेत.

ठळक मुद्देनाताळ, नववर्षानिमित्त धावणार विशेष रेल्वेकोकण व गोव्यात जाणाऱ्यांची संख्या वाढणार

रत्नागिरी : नाताळ आणि नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर कोकण व गोव्यात जाणाऱ्यांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाड्या धावणार आहेत. या गाड्या लोकमान्य टिळक टर्मिनस ते सावंतवाडी रोड, थिवीम, करमाळी आणि एर्नाकुलम मार्गावर धावणार आहेत.कोकण रेल्वे प्रशासनाने या गाड्यांचे नियोजन केले असून, त्यानुसार ०१०३७ लोकमान्य टिळक टर्मिनस ते सावंतवाडी ही विशेष गाडी २३ डिसेंबर आणि ६ जानेवारी रोजी रात्री १.१० वाजता सुटून त्याचदिवशी दुपारी ११.३० वाजता सावंतवाडीला पोहोचणार आहे. तर ०१०३८ गाडी त्याचदिवशी दुपारी २.२० वाजता निघून लोकमान्य टिळक टर्मिनसला रात्री १२.२० वाजता पोहोचणार आहे.

या गाडीला ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ स्थानकात थांबा दिलेला आहे.तसेच ०१०७९ क्रमांकाची विशेष गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस ते कोच्युवेली अशी दिनांक २१, २८ डिसेंबर आणि ४ जानेवारी रोजी रात्री १२.४५ वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी सकाळी ९.०५ वाजता कोच्युवेलीला पोहोचेल. ०१०८० क्रमांकाची गाडी दिनांक २०, २२ डिसेंबर आणि ५ जानेवारी रोजी दुपारी २.१५ वाजता सुटणार असून, लोकमान्य टिळक टर्मिनसला दुसऱ्या दिवशी रात्री ११.५५ वाजता पोहोचणार आहे.

या गाडीला ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, थिवीम, मडगाव, कारवार, कुमठा, मुरूडेश्वर, उडुपी आणि कोलाम हे थांबे देण्यात आले आहेत. 

टॅग्स :Konkan Railwayकोकण रेल्वेsindhudurgसिंधुदुर्ग