शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना राहुल गांधींच्या घरी मागे बसवलं? संजय राऊत म्हणाले, "आम्हाला स्क्रीन समोर बसून पाहताना..."
2
'शपथ पत्रावर सही करा नाहीतर देशाची माफी मागा'; निवडणूक आयोगाने राहुल गांधींना दिले दोन पर्याय
3
“उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत गेल्यापासून राहुल गांधी मातोश्रीवर गेले का?”; भाजपाचा सवाल
4
"मी विधवा झाली", पत्नीच्या डोळ्यासमोर पतीची हत्या; हुमा कुरेशीच्या वहिनीने सांगितलं काय घडलं?
5
शरणू हांडेचं अपहरण करणारा 'तो' युवक आणि मास्टरमाईंड कोण?; गोपीचंद पडळकरांचा खळबळजनक आरोप
6
Kapil Sharma : "जो सलमानसोबत काम करेल तो मरेल", कॅफे गोळीबारानंतर लॉरेन्स गँगची कपिल शर्माला धमकी
7
३ दिवसांत ६०% पेक्षा जास्त तेजी; ८०० रुपयांचा शेअर आता १२९९ पार, तुमच्याकडे आहे का?
8
Duleep Trophy 2025 : ज्युनिअरच्या नेतृत्वाखाली कर्तृत्व दाखवण्यासाठी मैदानात उतरणार हे २ सिनियर्स
9
सारखा भाऊच का? रक्षाबंधनाला बहिणीने ओवाळणी द्यायची की भावाने? भाऊबीजेचे काय, वाचा यमाची कथा...
10
थरारक! गोपीचंद पडळकर समर्थकाचं फिल्मी स्टाईल अपहरण; पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचला जीव
11
Video - 'ते' आले अन् धारदार शस्त्रांनी केला हल्ला; हुमा कुरेशीच्या भावाच्या हत्येचे CCTV फुटेज
12
Ajit Pawar: पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी आणि..., अजित पवारांची मोठी घोषणा
13
पालकमंत्रिपदाचा तिढा सुटेना; आता ध्वजवंदनावरून वादंग; १५ ऑगस्टचा मान गोगावलेंना देण्याची मागणी
14
पाक क्रिकेटर बलात्कार प्रकरणात अडकला; पोलिसांनी मॅच सुरु असतानाच ठोकल्या बेड्या
15
मी सापाच्या तीन पिल्लांना जन्म दिला; महिलेच्या दाव्याने खळबळ, समजताच गर्दी जमू लागली...
16
सुप्रीम कोर्टाचा १ निर्णय अन् अलाहाबाद हायकोर्टचे १३ न्यायाधीश नाराज; मुख्य न्यायाधीशांना पत्र
17
डोनाल्ड ट्रम्प यांना सुधरेना...! ५० टक्के टॅरिफवर देखील काहीच प्रतिक्रिया नाही, आता चर्चा बंद केल्याची घोषणा...
18
Intel CEO Lip Bu Tan Networth: कोण आहेत लिप-बू टॅन, ज्यांच्या मागे हात धुवून पडलेत डोनाल्ड ट्रम्प, किती संपत्तीचे मालक?
19
तिसरा श्रावण शनिवार: तुमची साडेसाती सुरू आहे? अश्वत्थ मारुती पूजनासह ‘हे’ ५ शनि उपाय कराच!
20
शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी घसरण; सेन्सेक्स १४५ आणि निफ्टी ५२ अंकांच्या घसरणीसह उघडले

नौसेना दिन सोहळा पाहता यावा यासाठी दांडी, तारकर्ली येथे खास व्यवस्था 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2023 13:59 IST

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची माहिती : राजकोट, तारकर्ली येथील कामांचा घेतला आढावा 

मालवण: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नौसेना दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 4 डिसेंबर रोजी मालवण, तारकर्ली दौऱ्यावर येत आहेत. राजकोट येथे उभारणी करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण पंतप्रधानांच्या हस्ते केले जाणार आहे. तर तारकर्ली ते किल्ले सिंधुदुर्ग समुद्र परिसर याठिकाणी नौसेना दिन सोहळा संपन्न होणार आहे. नौदल, शासन यांच्या माध्यमातून सर्व व्यवस्था उभारणी नियोजन सुरु आहे. सर्वसामान्यांना नौसेनेचा कार्यक्रम पाहता यावा यासाठी नियोजन करण्यात येत आहे. दांडी आणि तारकर्ली याठिकाणी खास व्यवस्था करण्यात येत आहे. नौसेना दिनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या सर्व कामांची पाहणी आपण केलेली असून सर्व प्रशासकीय यंत्रणा आपल्यापरिने १०० टक्के काम यशस्वी करण्यासाठी कार्यरत असल्याचे दिसून आले आहे. याबद्दल आनंद, समाधान आहे, असे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी मालवण स्वामी हॉटेल येथे पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले. पालकमंत्र्यांनी केली पाहणीदिवसभरात पालकमंत्र्यांनी किल्ले राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा उभारणी काम, तारकर्ली येथे नौसेना दिन कार्यक्रम व्यवस्था, टोपीवाला बोर्डिंग मैदान येथील हॅलिफॅड या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. यावेळी भाजप नेते माजी खासदार निलेश राणे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हाधिकारी किशोर तावडे, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड, भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, जिल्हा उपाध्यक्ष विजय केनवडेकर, राजन वराडकर, सचिन आंबेरकर, महेश मांजरेकर, आप्पा लुडबे, राजू परुळेकर, संतोष साटवीलकर, आशिष हडकर, ललित चव्हाण तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह केंद्रीय मंत्री सहभागी होणारनौसेना दिनाच्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नारायण राणे, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजीत पवार यांच्यासह काही केंद्रीय मंत्री व राज्याचे मंत्री उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा निश्चीत झालेला आहे. तसेच याठिकाणी सर्व नियोजन सर्व प्रकारची दक्षता घेवून कार्यक्रमाचे व्यवस्था केली जात आहे, असेही श्री. चव्हाण म्हणाले. नौसेना दिनाचा प्रमुख कार्यक्रम हा तारकर्ली एमटीडीसी पर्यटन केंद्राच्या किनारी होणार आहे. जनतेला हा कार्यक्रम पाहता यावा यासाठी व्यवस्था करण्याचे, नियोजन करण्यात येत आहे. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गindian navyभारतीय नौदल