शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

पावसामुळे बळीराजा लागला कामाला, बांदा परिसरात पेरणीला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 13:34 IST

गेले अनेक दिवस प्रतीक्षेत असलेल्या मान्सुनपूर्व पावसाने बांदा परीसरात मंगळवारपासून दमदार हजेरी लावली. दिवसभर मान्सुनपूर्व पावसाच्या सरी कोसळत होत्या. त्यामुळे मृग नक्षत्र कोरडे गेल्याने आज येणार, उद्या येणार अशा हुलकावणी देणाऱ्या वातावरणामुळे चिंताग्रस्त बनलेल्या बळीराजाला थोडाफार दिलासा मिळाला आहे. मान्सुनपूर्व पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा आपल्या शेतीच्या कामात व्यस्थ असल्याचे चित्र दिसत आहे. ​

ठळक मुद्देपावसामुळे बळीराजा लागला कामाला, बांदा परिसरात पेरणीला वेगमृग नक्षत्र कोरडे गेल्याने शेतकरी होता चिंतातूर

बांदा : गेले अनेक दिवस प्रतीक्षेत असलेल्या मान्सुनपूर्व पावसाने बांदा परीसरात मंगळवारपासून दमदार हजेरी लावली. दिवसभर मान्सुनपूर्व पावसाच्या सरी कोसळत होत्या. त्यामुळे मृग नक्षत्र कोरडे गेल्याने आज येणार, उद्या येणार अशा हुलकावणी देणाऱ्या वातावरणामुळे चिंताग्रस्त बनलेल्या बळीराजाला थोडाफार दिलासा मिळाला आहे. मान्सुनपूर्व पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा आपल्या शेतीच्या कामात व्यस्थ असल्याचे चित्र दिसत आहे.बांदा परिसरात मान्सुनपूर्व पावसाची प्रतीक्षा होती. वरूणराजाच्या आगमनाकडे बळीराजा चातकाप्रमाने डोळे लावून बसला होता. संपूर्ण मृगनक्षत्र यावर्षी कोरडे गेले. त्यामुळे चिंता वाढली होती. त्यातच चक्रीवादळामुळे मान्सून लांबणीवर जाण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. यामुळे चिंतेत आणखीनच भर पडली होती. पावसाने हजेरी लावल्यामुळे उष्णतेच्या माऱ्याने हैराण झालेल्या बळीराजाला दिलासा मिळाला.दोन दिवसांपूर्वी सुरू झालेल्या पावसामुळे शेतकरी शेतीकामात गुंतला असून भात पेरणीच्या कामाने आता वेग घेतला आहे. बाजारपेठेत भात बियाण्यांचे दर वाढलेले असताना सुद्धा शेतकऱ्यांचा कल खरेदी करताना दिसत आहे. बांदा, वाफोली, विलवडे, इन्सुली, पाडलोस, मडुरा, रोणापाल, शेर्ले, न्हावेली, कास, सातोसे, निगुडे भागातील ग्रामस्थांचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे. वर्षभर पुरेल एवढे धान्य (भात) राबवून घेतले जाते.यावर्षी पावसाने उशिरा हजेरी लावल्याने मशागत पूर्ण करून बळीराजाचे डोळे पावसाकडे लागले होते. मात्र, प्रत्यक्षात मंगळवारपासून वरुणराजा बरसण्यास प्रारंभ झाल्यामुळे बळीराजा पेरणीच्या कामात गुंतला आहे.पारंपरिक व आधुनिक पद्धतीने शेतीचे काम सुरु असून मजुरांचा तुटवडा जाणवत आहे. बहुतांश या भागातील शेतकऱ्यांनी रानटी प्राण्यांच्या उपद्रवाला कंटाळून शेतीकडे पाठ फिरवली असूनशेकडो एकर जमीन पडीक राहिली आहे. उपद्रवी प्राण्यांचा वावर वनविभागाने थांबवून आमची शेती, बागायती तसेच अन्य लागवड वाचविण्याची मागणी स्थानिक शेतककडून होत आहे. 

टॅग्स :Rainपाऊसsindhudurgसिंधुदुर्ग