शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

गेल्या सहा महिन्यांची वीज देयके माफ करा ! भाजपची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2020 16:14 IST

राज्य शासनाने दरमहा ३०० युनिट पर्यंत वापर असणारे सर्व घरगुती वीज ग्राहकांची मागील ६ महिन्यांची वीज देयके माफ करावी . अशी मागणी निवेदनाद्वारे भाजपच्यावतीने विजवितरणचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते यांच्याकडे केली आहे.

ठळक मुद्देगेल्या सहा महिन्यांची वीज देयके माफ करा ! भाजपची मागणी कणकवली येथे कार्यकारी अभियंत्यांना निवेदन

कणकवली : कोरोना महामारीमुळे देशात आणि राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आले होते. या काळात रोजीरोटीच बंद असल्याने उदरनिर्वाह करताना गरीब, कष्टकरी, कनिष्ठ आणि मध्यमवर्गीय या सर्वांचीच दमछाक झाली आहे. त्यामुळे सर्व महिन्यांची वीज देयके येताच जनतेमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.

राज्य शासनाने दरमहा ३०० युनिट पर्यंत वापर असणारे सर्व घरगुती वीज ग्राहकांची मागील ६ महिन्यांची वीज देयके माफ करावी . अशी मागणी निवेदनाद्वारे भाजपच्यावतीने विजवितरणचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते यांच्याकडे केली आहे.कणकवली येथील वीज वितरणच्या विभागीय कार्यालयावर मंगळवारी भाजपच्या शिष्टमंडळाने धडक दिली . तसेच जनतेच्या व्यथा कार्यकारी अभियंत्यांसमोर मांडल्या. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली , कणकवली मंडल अध्यक्ष राजन चिके,संतोष कानडे, वैभववाडी मंडल अध्यक्ष नासीर काझी, देवगड मंडल अध्यक्ष रवी पाळेकर ,भालचंद्र साठे, जिल्हापरिषद समाजकल्याण सभापती शारदा कांबळे, वैभववाडी माजी उपसभापती हर्षदा हरयाण ,रमेश पावसकर,बुलंद पटेल,मिलिंद मेस्त्री, संदीप मेस्त्री, पप्पू पुजारे, बबलू सावंत, राजू पेडणेकर, सुशील सावंत,प्रकाश पारकर, अण्णा कोदे , समर्थ राणे आदी उपस्थित होते.यावेळी कार्यकारी अभियंत्यांना निवेदनही देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, लॉकडाऊनमुळे गेले ६ महिने घरात बसून काढावे लागल्याने हातावर पोट असलेल्या आणि पगारावर अवलंबून असलेल्या सर्वांचीच दमछाक झाली आहे. लॉकडाऊन काही अंशी कमी असले तरी अजूनही अनेकांची रोजीरोटी सुरु झालेली नाही. गाठीशी असलेला थोडाबहुत पैसाही संपत आला आहे. त्यामुळे अनेकांच्या मनात उपासमारीची भीती डोकावू लागली आहे. अनेकांना घरभाडे भरता आलेले नाही . त्याचबरोबर वीज बिलही भरता येत नाही.वीजदर वाढीबद्दल अगोदरच लोकांच्या मनात नाराजी आहे. त्यातच रोजीरोटी सुरु नसताना कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा ? असा प्रश्न आहे. याचवेळी महावितरण कडून वीज बिले भरण्याचा तगादा सुरु आहे. त्यामुळे लोकांमधील असंतोष वाढला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने राज्य वीज नियामक कायद्यातील कलम ४ चा वापर करुन तातडीने सर्व वीज देयकांना स्थगिती देऊन ३०० युनिट पर्यत वीज वापर करणाऱ्या सर्व घरगुती वीज ग्राहकांची मागील ६ महिन्यांची वीज देयके माफ करावी.केंद्र शासनाने जाहीर केलेल्या २० लाख कोटीच्या पॅकेजमध्ये सर्व राज्याच्या वीज वितरण कंपनींना ९० हजार कोटींचे अर्थ सहाय्य जाहीर केलेले आहे. यातील सुमारे ३ हजार कोटी रुपये राज्य सरकार वीज वितरण कंपनीकडे जमा झाले आहेत. यामुळे राज्यातील जनतेची ३०० युनिटपर्यंतची वीज बिल माफ करणे सहज शक्य आहे. त्यामुळे आमची असलेली वीज बिल माफ करण्याची मागणी शासनापर्यंत पोहचवावी. असेही या निवेदनात म्हटले आहे.कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी !यावेळी ' सत्ताधारी महाविकास आघाडीचा निषेध असो' , 'ठाकरे सरकार हाय, हाय' , 'भरमसाठ विजबिले मागे घ्या', ' वाढीव वीजबिल आकार कमी करा' अशा जोरदार घोषणा भाजप कार्यकर्त्यांकडून देण्यात आल्या. 

टॅग्स :mahavitaranमहावितरणBJPभाजपाsindhudurgसिंधुदुर्ग