शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

एसटी कामगारांच्या वेतनासह अन्य समस्या तत्काळ सोडवा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2020 20:07 IST

collector, statetransport, sindhudurg, एसटी कर्मचाऱ्यांचे दिवाळी सणापूर्वी दोन महिन्याचे थकित वेतन मिळावे. तसेच महागाई भत्त्याची थकबाकी व शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सण उचल मिळावी. अशा विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून ते सोमवारी अप्पर जिल्हाधिकारी मंगेश जोशी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.

ठळक मुद्देएसटी कामगारांच्या वेतनासह अन्य समस्या तत्काळ सोडवा !मान्यताप्राप्त संघटनेकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन ; शासनाचे लक्ष वेधले

कणकवली : एसटी कर्मचाऱ्यांचे दिवाळी सणापूर्वी दोन महिन्याचे थकित वेतन मिळावे. तसेच महागाई भत्त्याची थकबाकी व शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सण उचल मिळावी. अशा विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून ते सोमवारी अप्पर जिल्हाधिकारी मंगेश जोशी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.यावेळी संघटनेचे विभागीय अध्यक्ष सुरेंद्र मोरजकर , विभागिय सचिव विनय राणे , विभागिय खनिजदार अनिल नर, रविंद्र भिसे आदी उपस्थित होते. या निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाच्या आपत्ती काळात एस.टी. कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून अत्यावश्यक सेवा बजावत आहेत . तसेच सध्या मुंबई बेस्टची प्रवाशी वाहतुकही अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत करीत आहेत . त्यामध्ये बरेच कर्मचारी बाधित झालेले असून सुमारे ७४ कर्मचारी मृत झालेले आहेत .कोरोना कालावधीत कामगार प्रतिकुल परिस्थितीत काम करीत असतानाही कामगारांना माहे ऑगस्ट २०२० पासून वेतन दिलेले नाही . त्यामुळे कामगार व त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आलेली आहे . शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एस.टी. कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता व सण उचल देण्याचे कामगार करारान्वये मान्य केलेले आहे .

शासकीय कर्मचाऱ्यांना माहे डिसेंबर २०१९ पासून वाढीव ५ टक्के महागाई भत्ता लागू करण्यात आलेला आहे . परंतु एस.टी. कामगारांना तो अद्याप लागू केलेला नाही . त्याचप्रमाणे सन २०१८ ची वाढीव २ टक्क्यांची तीन महित्यांची थकबाकी व सन २०१९ ची ३ टक्क्यांची नऊ महिन्यांची महागाई भत्त्याची थकबाकीही एस.टी.कामगारांना अद्याप मिळालेली नाही . त्याचप्रमाणे शासकीय कर्मचाऱ्यांना १२,५०० रुपये सण उचल लागू केलेली आहे . परंतु एस.टी.कामगारांना अद्यापर्यंत ती लागू केलेली नाही .एस.टी. कर्मचाऱ्यांना त्यांनी केलेल्या कामाचे वेतन नियत देय तारखेस देण्याची जबाबदारी कायद्याने एस.टी.प्रशासनाची असतानाही त्यांनी वेतन दिलेले नाही . त्यामुळे यापुढेही या मागण्या मान्य न झाल्यास एस.टी. कर्मचारी आपल्या रहात्या घरासमोर आपल्या कुटंबियांसह ९ नोव्हेंबर २०२० रोजी आक्रोश व्यक्त करतील . त्यामुळे एस.टी.कामगार व त्यांच्या कुटुंबियांची वेतनाविना होणारी उपासमार थांबविण्यासाठी आपण शासनदरबारी प्रयत्न करावेत . असेही या निवेदनात म्हटले आहे. 

टॅग्स :state transportएसटीcollectorजिल्हाधिकारीsindhudurgसिंधुदुर्ग