शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या; ३००० कोटींची मालमत्ता जप्त, फ्लॅट, प्लॉट आणि ऑफिसचा समावेश, काय आहे प्रकरण?
2
दीड ते दाेन लाखांनी घरे हाेणार स्वस्त? सिडकाे घरांच्या किमती कमी करण्यासाठी आज बैठक
3
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
4
वर्ल्डकपच्या संघातही नव्हती, ऐनवेळी संधी मिळाली अन्..., शेफाली वर्मा अशी ठरली मॅचविनर
5
स्वप्न साकार! भारतीय महिलांनी क्रिकेट वर्ल्डकप जिंकताच बॉलिवूड कलाकारांकडून अभिनंदनाचा वर्षाव
6
‘जेएनपीए-वैतरणा’वर मालगाडी गेली निर्धाेक; 'डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर'अंतर्गत महत्त्वाचे पाऊल
7
१९८३ चा क्षण महिला संघाने जिवंत केला! सचिन तेंडुलकरकडून टीम इंडियाचे कौतुक करत 'प्रेरणादायी' पोस्ट
8
आजचे राशीभविष्य,०३ नोव्हेंबर २०२५: इतरांचे भले करण्याच्या नादात संकटे येतील; पदोन्नती, व्यापारी सौदे यशस्वी
9
आता रिक्षा, टॅक्सी, बससाठी लागेल स्वतंत्र पार्किंग; राज्य परिवहन विभागाचे नवे धोरण
10
विशेष लेख: दुबार मतदार, मतचोरी आरोपावर भाजप नेते बोलतात, निवडणूक आयोग का बोलत नाही..?
11
'बाहुबली'ने उचलला ४,४१० किलोचा भार, सर्वात जड उपग्रहाला पाठवले अवकाशात
12
मंत्री बंगल्यावरील कामात कोट्यवधीच्या भ्रष्टाचारावर माेहाेर; चौकशीत अभियंते दोषी
13
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
14
‘परिवहन’ची मंजुरी इलेक्ट्रिकला अन् सुसाट धावतात पेट्रोल बाइक टॅक्सी; कारवाईला ठेंगा
15
अग्रलेख: ‘सत्या’च्या मोर्चात ‘महा-मनसे’! मविआ + राज ठाकरे : शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे !!
16
महापौर आमचाच होऊ दे; उद्धव ठाकरे यांचे महोत्सवात देवाला गाऱ्हाणे; कार्यकर्त्यांना सल्ला
17
पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धाच्या झळांनी होरपळलेले नागरिक आणि ‘कलिंगड’ आइस्क्रीम!
18
कोस्टल रोड वाहतुकीसाठी २४ तास खुला; पण अंधारातून प्रवास असल्याने अपघाताचा धोका वाढला !
19
बांगलादेशींच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी; पालिका निवडणुकीमुळे वातावरण तप्त
20
विशेष लेख: शेतकऱ्यांना कर्जमुक्ती नाही, तर आम्ही थांबणार नाही; हा एल्गार थांबणार नाही..!!

"...तर विधानभवनाच्या पायऱ्यांवरच्या घोषणा आणखी वाढतील", दीपक केसरकरांनी विरोधकांना डिवचले

By अनंत खं.जाधव | Updated: August 19, 2022 16:26 IST

Deepak Kesarkar: ठाकरे गटाचा आमदार आमच्या संपर्कात असल्याचे सांगितले तर विधानभवनाच्या पायऱ्यावरच्या घोषणा आणखी वाढतील अशी कोपरखळी विरोधकांना मारत लवकरच या घोषणांना सडेतोड उत्तर दिले जाईल, असा इशारा दीपक केसरकर यांनी दिला.

- अनंत जाधवसावंतवाडी : ठाकरे गटाचा आमदार आमच्या संपर्कात असल्याचे सांगितले तर विधानभवनाच्या पायऱ्यावरच्या घोषणा आणखी वाढतील अशी कोपरखळी विरोधकांना मारत लवकरच या घोषणांना सडेतोड उत्तर दिले जाईल, असा इशारा शिंदे गटाचे प्रवक्ते तथा राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिला ते सावंतवाडीत बोलत होते यावेळी त्यांनी केंद्राचे शैक्षणिक धोरण राज्यातही लागू करणार असल्याचेही स्पष्ट केले.सावंतवाडी चे माजी नगराध्यक्ष संजू परब यांना शुभेच्छा देण्यासाठी आले होते.यावेळी शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावले,विद्याधर परब बंटी पुरोहित,दिलीप भालेकर,सत्यवान बांदेकर आदि उपस्थित होते.

केसरकर म्हणाले, राज्यात अडीच वर्षांपूर्वी मागच्या दरवाजाने महाविकास आघाडी सरकार आले. त्यामुळे ते जास्त दिवस टिकले नाही आता खऱ्या अर्थाने हिंदुत्वाचा सरकार आलेले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून विकासाचा रथ सर्वांना मिळून पुढे घेऊन जायचं आहे.

माझ्याकडे असलेले शालेय शिक्षण खाते हे राज्यातील प्रमुख खाते आहे.त्यामुळे मला जास्ती जास्त काम करावे लागते त्यातून स्थानिकांशी सर्पक ही कमी प्रमाणात राहात असतो असे असले विकास कामे थांबणार नाही याची जबाबदारी मी घेतली आहे.लवकरच राज्यात केंद्राचे शैक्षणिक धोरण राबवण्यात येणार आहे. त्याची सुरुवात ही करण्यात आली आहे.असे मंत्री केसरकर म्हणाले.

आपल्या संपर्कात ठाकरे गटातील आमदार असल्याची चर्चा सध्या आहे का असे विचारता त्यांनी मात्र त्यावर बोलण्याचे  टाळत मी असे म्हटले तर असा टोला विरोधकांना लगावला ह्या घोषणांवर लवकरच सडेतोड उत्तर दिले जाणार असून त्यानंतर कधीच घोषणा होणार नाहीत असा इशाराही मंत्री केसरकर यांनी दिला.

परब यांच्या पाठीशी माझे आशीर्वादच राहतीलमाझे वय आता आशीर्वाद देण्याचे आहे मात्र मी कामाचा व्याप कुठेही कमी केला नाही असे म्हणत मंत्री केसरकर यांनी संजू परब यांच्या कार्याचा गौरव केला तसेच त्यांच्या पाठीशी माझे कायम आशीर्वाद राहतील असे सांगितले.

टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाSawantwadiसावंतवाडी