शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
2
स्कुबा डायव्हिंग करताना ५२ वर्षीय प्रसिद्ध गायकाचा मृत्यू, चाहत्यांना मोठा धक्का
3
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
4
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
5
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
6
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
7
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
8
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
9
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
10
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
11
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
12
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
13
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
14
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
15
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
16
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
17
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल
18
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
19
"मोदी-फडणवीसांच्या आईवर बोलले गेले, तेव्हा शरद पवारांनी फोन केला नाही, मी माफी कशासाठी मागू"
20
सरकारी नोकरी मिळवण्याचा गोल्डन चान्स; इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती

..तर राष्ट्रपती, पंतप्रधानांच्या दौऱ्याला विरोध; दांडी ते राजकोट किनारपट्टीवरील मच्छिमार आक्रमक

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: October 26, 2023 18:31 IST

नौदल दिनाच्यानिमित्ताने येत्या ४ डिसेंबर रोजी मालवणमध्ये येणार

मालवण (सिंधुदुर्ग) : नौदल दिनाच्यानिमित्ताने देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू येत्या ४ डिसेंबर रोजी मालवणमध्ये येत आहेत. त्यांच्या दौऱ्यामुळे मालवणचे नाव देशाच्या आणि जागतिक पातळीवर पोहोचणार असल्याने या दौऱ्याचे आम्ही स्वागतच करतो. मात्र, या दौऱ्याचे कारण काढून प्रशासनाने राजकोट ते दांडी किनारपट्टीवरील ९९ बांधकामे पाडण्याच्या नोटीसा बजावल्या आहेत. एका दिवसाच्या दौऱ्यासाठी आमची हजारो कुटुंबे विस्थापित करण्याचा घाट कोणी घालत असेल तर या दौऱ्याला आमचा विरोध राहणार असल्याची कडक भूमिका मालवणमधील श्रमीक मच्छीमार आणि पर्यटन व्यावसायिकांनी जाहीर केली आहे.याबाबत आपण जिल्हाधिकाऱ्यांना भेटून आमचे म्हणणे मांडणार आहोत. या अन्यायकारक नोटीशीविरोधात न्यायालयीन लढाई लढण्याची आमची तयारी आहे. वेळ पडल्यास साम, दाम, दंड, भेद या नितीचा वापर करून मोदींच्या दौऱ्याला विरोध केला जाईल. असा इशारा देण्यात आला आहे.दांडी ते राजकोट किनारपट्टी वरील सुमारे ९९ अनधिकृत बांधकामे सात दिवसात हटविण्याचे आदेश महसूल प्रशासनाने एका नोटीशीव्दारे काढले आहेत. यामध्ये काही नियमीत बांधकामांचादेखील समावेश आहे. या निषेधार्थ गुरूवारी दांडी येथील दांडेश्वर मंदिर परिसरात मच्छीमार, पर्यटन व्यावसायिक, व्यापारी यांची महत्वपूर्ण बैठक झाली.यावेळी व्यासपिठावर मच्छीमार नेते दिलीप घारे, बाबला पिंटो, रूपेश प्रभू, विली डिसोजा उपस्थित होते. तसेच शक्ती नागवेकर, नरेश हुले, मारूती हुले, संतोष शिरगावकर, सुमित ताम्हणकर, गोपीनाथ तांडेल, जॉन्सन डायस, विवेक पारकर, फारूख अहमद, चिन्मय तांडेल, राजू कोयले, योगेश काळसेकर, विशाल जुवाटकर, कमलेश कोचरेकर, निकिता केळुसकर, प्रमोद खवणेकर, भूषण तोडणकर, चंद्रकांत प्रभू आदी उपस्थित होते.

स्थानिकांना विस्थापित करण्याचे षडयंत्र

पंतप्रधान मालवणमध्ये येत असल्याने अनेक सोयीसुविधा निर्माण होण्याच्या शक्यतेमध्ये आम्ही होतो. मात्र, ते बाजूलाच राहून स्थानिकांना विस्थापित करण्याचे षडयंत्र प्रशासकीय यंत्रणांकडून आखण्यात येत आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात येत नसताना किनाऱ्यावर उभारण्यात आलेल्या रोजीरोटीच्या झोपड्या तोडण्याचे काम केले जात असेल तर आम्ही साम, दाम, दंड, भेद याचा वापर करून लढा उभा करू.

एका नोटीशीव्दारे व्यवसाय उध्वस्त करू देणार नाहीसुरक्षिततेच्यादृष्टीने आवश्यक ते सहकार्य करण्याच्या भूमिकेत असतानाही प्रशासनाकडून जबरदस्तीने आमचे व्यवसाय हटविण्याचा प्रयत्न कशासाठी केला जात आहे ? असा सवाल मच्छीमार प्रतिनिधींनी व्यक्त केला. पंतप्रधान देशातील तरूणांना रोजगार देण्याचे ध्येय ठेवत असताना युवकांनी उभा केलेला व्यवसाय तोडण्यासाठी शासन प्रयत्नशील का आहे ? पर्यटन आणि मच्छीमार व्यवसाय उभा करण्यासाठी अनेकांनी मेहनत घेतली असून तो एका नोटीशीव्दारे हा व्यवसाय आपण कदापी उध्वस्त होवू देणार नाही.

..तर मच्छीमार असहकार्याची भूमिका घेणारपंतप्रधानांच्या दौऱ्याआडून आमच्या रोजी रोटीचा प्रश्न निर्माण करण्यात येत आहे. आजपर्यंत आम्ही प्रशासकीय यंत्रणेला सहकार्याची भूमिका घेतली आहे. आता मात्र, शासन आमचा विचार करत नसेल तर आगामी काळात शासकीय यंत्रणेसाठी आमची असहकार्याची भूमिका असेल. शासन जबरदस्तीने आम्हाला विस्थापित करू शकत नाही.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गMalvan beachमालवण समुद्र किनाराNarendra Modiनरेंद्र मोदीPresidentराष्ट्राध्यक्ष