शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

आतापर्यंत व्याधीग्रस्त ४५ वर्षांवरील १६ हजार ४८४ जणांना कोरोना प्रतिबंधक लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 17:41 IST

Corona vaccine Sindhudurg- माझे कुटुंब, माझी जबाबदारी या योजनेंतर्गत नोव्हेंबर-डिसेंबर या कालावधीत सर्व्हे करण्यात आलेल्या ९७ हजार ५९५ कुटुंबातील व्याधीग्रस्त ४५ वर्षावरील १६ हजार ४८४ जणांना आतापर्यंत कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे, अशी माहिती अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे यांनी दिली.

ठळक मुद्देआतापर्यंत व्याधीग्रस्त ४५ वर्षांवरील १६ हजार ४८४ जणांना कोरोना प्रतिबंधक लस अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे यांनी दिली माहिती

ओरोस/सिंधुदुर्ग :माझे कुटुंब, माझी जबाबदारी या योजनेंतर्गत नोव्हेंबर-डिसेंबर या कालावधीत सर्व्हे करण्यात आलेल्या ९७ हजार ५९५ कुटुंबातील व्याधीग्रस्त ४५ वर्षावरील १६ हजार ४८४ जणांना आतापर्यंत कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे, अशी माहिती अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे यांनी दिली.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नोव्हेंबर ते डिसेंबर या कालावधीत आशा कर्मचारी व आरोग्य सेविका यांच्या मार्फत माझे कुटुंब माझे जबाबदारी या योजनेंतर्गत घरोघरी जाऊन ४५ वर्षावरील व्याधीग्रस्त व्यक्तीचा सर्व्हे करण्यात आला होता. यामध्ये ४५ ते ५९ वयोगटातील असलेल्या ६ हजार ९३३ जणांची नोंदणी करण्यात आली तर ६० वर्षावरील ८ हजार ४८३ जणांची नोंदणी करण्यात आली होती.

या नोंदणी करण्यात आलेल्या ४५ ते ५९ वयोगटातील असलेल्या ६,९३३ व्यक्तींपैकी ६,९०८ जणांना तर ६० वर्षावरील नोंदणी करण्यात आलेल्या ८,४८३ व्यक्तींपैकी ८,३५१ जणांना आतापर्यंत कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. तर या व्यतिरिक्त १,२४१ सर्वसामान्य नागरिकांपैकी १,२२५ जणांना आतापर्यंत कोरोना लसीकरणाचा डोस देण्यात आला आहे.अशाप्रकारे ४५ वर्षावरील जिल्ह्यातील १६ हजार ४८४ जणांना आतापर्यंत कोरोना लसीचा डोस देण्यात आला असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे यांनी दिली. उर्वरित ४५ वर्षावरील व्याधीग्रस्त व्यक्तींना कोरोना लस देण्याची प्रक्रिया जिल्ह्यातील विविध शासकीय दवाखान्यांमध्ये सुरू आहे. तरी जिल्ह्यातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी डॉ. कांबळे यांनी केले आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसsindhudurgसिंधुदुर्ग