शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
3
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
4
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
5
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
6
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
7
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
8
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
9
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
10
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
11
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
12
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
13
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
14
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
15
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
16
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
17
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
18
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
19
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
20
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."

नरेंद्र डोंगरातून सागवान चोरीला, वन विभागाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 13:32 IST

सह्याद्रीच्या कॉरिडोअरमधील १६०० हेक्टर जमिनीत वृक्षतोड झाल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता सावंतवाडीतील नरेंद्र डोंगरावर मोठ्या प्रमाणात सागाची तोड झाल्याचे प्रकरण बाहेर आले आहे. तब्बल साठ ते सत्तर लाख रूपयांची सागवानाची झाडे अवैधरित्या तोडण्यात आली आहेत. ज्या ठिकाणचे साग तोडण्यात आले आहेत, त्यांचे बुंधे मात्र नरेंद्र डोंगरावर जाणाऱ्या- येणाऱ्यांना दिसत असून, वन विभाग मात्र नरेंद्र डोंगराच्या नूतनीकरणात गुंतले आहे. मात्र, आपल्या मालमत्तेवर पुरता दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देनरेंद्र डोंगरातून सागवान चोरीला, वन विभागाचे दुर्लक्ष अधिकारी गुंतले बांधकामात

सावंतवाडी : सह्याद्रीच्या कॉरिडोअरमधील १६०० हेक्टर जमिनीत वृक्षतोड झाल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता सावंतवाडीतील नरेंद्र डोंगरावर मोठ्या प्रमाणात सागाची तोड झाल्याचे प्रकरण बाहेर आले आहे. तब्बल साठ ते सत्तर लाख रूपयांची सागवानाची झाडे अवैधरित्या तोडण्यात आली आहेत. ज्या ठिकाणचे साग तोडण्यात आले आहेत, त्यांचे बुंधे मात्र नरेंद्र डोंगरावर जाणाऱ्या- येणाऱ्यांना दिसत असून, वन विभाग मात्र नरेंद्र डोंगराच्या नूतनीकरणात गुंतले आहे. मात्र, आपल्या मालमत्तेवर पुरता दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात वन विभागाच्या पदराआडून मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असल्याचे अनेक वेळा पुढे आले आहे. मात्र, वन विभाग आपल्या साधनसंपत्तीकडे दुर्लक्ष करीत वन विभागाच्या हद्दीत बांधकामे करण्यात गुंतले आहे. मध्यंतरी सह्याद्रीच्या कॉरिडोओरमधील १६०० हेक्टर जमिनीत मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाल्याचे प्रकरण स्वयंसेवी संस्थेने उघडकीस आणले होते. याचे पुरावेही उच्च न्यायालयात देण्यात आले आहेत. याची चौकशीही सुरू आहे. मात्र, एवढी मोठी वृक्षतोड होऊनसुध्दा वनविभागाचे अधिकारी डोळेझाक करताना दिसत आहेत.वन विभागाच्या मुख्य कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर नरेंद्र डोंगर आहे. या डोंगरावर मोठ्या प्रमाणात वन विभागाची साधनसंपत्ती आहे. वेगवेगळ््या प्रकारची झाडे आहेत. मात्र, याकडे लक्ष देण्यास वन विभागाला वेळ नाही. वन विभाग नरेंद्र डोगरांवर लाईटिंग करत आहे. मात्र, हे करत असताना वन विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांचा डोळा चुकवून सागवानाची तब्बल ३४ झाडे परस्पर तोडून नेण्यात आली आहेत.या सागवानाची बाजारभावाने किंमत पन्नास ते साठ लाख रूपये होत आहे. एवढ्या मोठ्या किंमतीची सागवानाची तोड होऊनही वन विभागाचे अधिकारी या सर्व प्रकरणाकडे डोळेझाक करीत आहेत. नरेंद्र डोंगर हा सर्व बाजंूनी वन विभागाच्या ताब्यात आहे. अनेक वन कर्मचारी तेथे देखरेखीसाठी असतात. असे असतानाही सागवानाची झाडे तोडण्यात आल्याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.

ही झाडे तोडत असताना चोरट्यांनी झाडांचे बुंधे मात्र जागेवर ठेवले आहेत. ही तोड साधारणत: वर्षभरातील असावी, असा अंदाज स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे. या सर्व झाडांची वये पूर्ण होत आली होती. त्यामुळे त्यांची किंमत बाजारपेठेत मोठी येईल, यात शंकाच नाही.ही सागवानाची झाडे तोडण्यात आल्यानंतर चोरट्यांनी आपली चोरी लपविण्यासाठी सागवानाच्या झाडांच्या बुंध्यांवर पाळापाचोळा टाकला आहे. त्यामुळे ही तोड पटकन कोणाच्याही लक्षात येत नाही. मात्र, वन विभागाने या सर्वाकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. वन विभागाने आपल्या मालमत्तेचे संरक्षण करण्याऐवजी मोठ्या प्रमाणात बांधकामात आपला लक्ष घातल्याने बेसुमार जंगल तोड सध्या होत असल्याचे सांगण्यात येत आहे. 

टॅग्स :forest departmentवनविभागsindhudurgसिंधुदुर्ग