शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: कुणकेरी येथील जंगलात माडाच्या पानांची तस्करी, तिघेजण ताब्यात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2024 12:30 IST

वनविभागाच्या फिरत्या पथकाची कारवाई

सावंतवाडी : वन हद्दीत येऊन भेडले माडाच्या पानांची तस्करी केल्याप्रकरणी सावंतवाडी वनविभागाच्या पथकाने उत्तर प्रदेश येथील तिघांना ताब्यात घेतले. ही कारवाई मंगळवारी सकाळी कुणकेरी येथील जंगलात करण्यात आली आहे.या प्रकरणी नईम सलमानी (२७), अनिल भार्गव (२१) आणि रिजवान सलमानी (२५, तिघे ही राहणार उत्तर प्रदेश) अशी त्यांची नावे आहे. दरम्यान या तिघांना येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता दोन दिवसांची वनकोठडी सुनावण्यात आली आहे.सावंतवाडीचे वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर त्यांच्या टीमसह जंगल तपासणी करीत असताना जंगलामध्ये जागोजागी भेडल्या माड झाडांची तोड करून पाने गोळा करत असल्याचे दिसून आले. या तोडीचा कानोसा घेत आरोपींचा तपास केला असता काही अज्ञात व्यक्ती जंगलामध्ये विळ्याच्या साहाय्याने भेडल्या माडाची तोड करून, पानांचे ढीग बांधत असल्याचे दिसून आले.फिरते पथक वनपाल मधुकर काशिद, पोलिस हवालदार गौरेश राणे, वनरक्षक प्रमोद जगताप, दत्तात्रय शिंदे, धनंजय यादव यांनी मोठ्या शिताफीने आरोपींना ताब्यात घेतले. पकडण्यात आलेल्या यातील तीनही आरोपींची सखोल चौकशी केली असता हे आरोपी परप्रांतीय असल्याचे निष्पन्न झाले.आरोपींच्या सोबतच दोन दुचाकीदेखील ताब्यात घेण्यात आल्या. या आरोपींना सावंतवाडी येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिन्ही आरोपींना दोन दिवसांची वन कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपींच्यावतीने ॲड. वैभव चव्हाण यांनी तर वन विभागाच्यावतीने वनक्षेत्रपाल फिरते पथक मदन क्षीरसागर यांनी युक्तिवाद केला. ही कारवाई सावंतवाडीचे उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी, सहायक वनसंरक्षक डॉ. सुनील लाड यांच्या मार्गदर्शनाखाली फिरते पथक सावंतवाडीच्यावतीने करण्यात आली आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गforest departmentवनविभाग