शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

कणकवली: पुतळा स्थलांतरण मुद्दयावरून नगरपंचायत सभेत घोषणाबाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2022 17:43 IST

सलग आठ सभांना मुख्याधिकारी अनुपस्थित

कणकवली : कणकवली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा गेल्‍या महिन्यात स्थलांतरण झाला होता. याबाबत नगरसेवक ॲड. विराज भोसले यांनी नरपंचायत प्रशासनाच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. त्‍यानंतर सत्ताधारी नगरसेवकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयघोष केला. दरम्‍यान सलग आठ सभांना मुख्याधिकारी अनुपस्थित राहत असल्‍याबद्दल विरोधी नगरसेवक कन्हैया पारकर यांनी नाराजी व्यक्‍त केली.कणकवली नगरपंचायतची सभा नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या अध्यक्षतेखाली आज, सोमवारी झाली. उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्यासह ॲड. विराज भोसले, अभिजित मुसळे, अबिद नाईक, रवींद्र गायकवाड, मेघा गांगण, उर्मी जाधव, कविता राणे, प्रतीक्षा सावंत आदी नगरसेवक उपस्थित होते.बैठकीच्या सुरवातीलाच नगरसेवक अॅड. विराज भोसले यांनी पुतळा स्थलांतरण प्रश्‍नी नगरपंचायतीच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. यानंतर अभिजित मुसळे यांच्यासह सत्ताधारी नगसेवकांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा घोषणा देत सभागृह निनादून सोडले. याच मुद्दयावर विरोधी पक्ष नगरसेवक कन्हैया पारकर यांनी पुतळा स्थलांतर प्रश्‍नी नगरपंचायतीने राबविलेल्‍या सर्व प्रक्रियेची माहिती द्या अशी मागणी सभागृहात केली.पारकर यांच्या प्रश्‍नावर बोलताना नगराध्यक्ष समीर नलावडे म्‍हणाले, माजी नगराध्यक्ष संदेश पारकर यांनीही छत्रपतींच्या पुतळा स्थलांतरणाबाबतची सर्व माहिती ही माहिती अधिकारामध्ये मागितलेली आहे. सर्व माहिती तयार ठेवण्यात आली आहे. पुढील एक दोन दिवसांत मुख्याधिकारी हजर होतील. त्‍यानंतर रीतसर पैसे भरून सर्व माहिती घ्या असे स्पष्‍ट केले.दरम्‍यान सलग आठ बैठकांना मुख्याधिकारी उपस्थित राहिलेले नाहीत याबाबत पारकर यांनी नाराजी व्यक्‍त केली. यावर उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी मुख्याधिकारी नसले तरी विकासकामे थांबलेली नाहीत, असा मुद्दा मांडला. तर नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी येत्‍या आठ दिवसांत आपापल्‍या प्रभागातील विकासकामांची यादी आमच्याकडे द्या. मंत्रीमंडळ विस्तार होताच नगरपंचायतीची सर्व कामे पूर्ण होतील. असा विश्‍वास व्यक्‍त केला.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग