शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सहा मार्ग अंशत, दोन मार्ग पूर्णत: बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 17:41 IST

‘एनडीआरएफ’ची टीम जिल्ह्यात दाखल

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात हवामान खात्याने ‘रेड अलर्ट’ जारी केल्यानुसार काही भागात मुसळधार पाऊस पडला. मंगळवारी रात्री मुसळधार पावसाने वैभववाडी तालुक्याला झोडपून काढले. विविध भागांत कोसळणाऱ्या पावसामुळे त्या त्या ठिकाणी पाणी आल्याने, तसेच काही रस्त्यांची कामे सुरू असल्याने जिल्ह्यातील ६ मार्ग वाहतुकीसाठी अंशतः, तर २ मार्ग वाहतुकीसाठी पूर्णतः बंद ठेवण्यात आले आहेत.बुधवारी मात्र सायंकाळपर्यंत जिल्हा मुख्यालयासह अन्य काही भागांत पावसाच्या हलक्या सरी पडल्या; मात्र ढगाळ वातावरण कायम होते. बुधवारी सकाळी आठ वाजेपर्यंत जिल्ह्यात ३६ च्या सरासरीने २८८ मि.मी. पाऊस पडला. यात वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक १०२ मि.मी. पाऊस पडला आहे.जिल्ह्याला हवामान खात्याने मंगळवार व बुधवार दोन्ही दिवस ‘रेड अलर्ट’ जारी केला होता. त्यानुसार वैभववाडी तालुक्यात मुसळधार पाऊस पडला. तालुक्यात अनेक भागांत पाणी आले होते. वैभववाडी तालुक्यात महामार्गाचे काम अर्धवट असल्याने रस्त्याच्या कडेला पाणी साचले होते. त्याशिवाय जिल्ह्यातील अन्य भागांत मंगळवारी रात्री मुसळधार पावसाच्या सरी पडल्या. त्यामुळे रस्त्यावर पाणी आल्याने वाहतुकीसाठी मार्ग बंद झाले आहेत. त्याशिवाय काही मार्गांवर पुलांचे काम सुरू असून, ते अर्धवट राहिल्याने वाहतूक पूर्णतः बंद असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.यात ६ मार्ग वाहतुकीसाठी अंशतः, तर २ मार्ग वाहतुकीसाठी पूर्णतः बंद आहेत. त्यामध्ये देवगड-नांदगाव रस्ता, तोंडवली रस्त्यावर मोरी खचल्याने वाहतूक अंशतः बंद आहे. देवगड-पाटघर रस्त्यावर पाणी आल्याने रस्ता अंशतः बंद, देवगड-कामते मार्गावर कामते येथे रस्त्यावर पाणी आल्याने मार्ग अंशतः बंद, देवगड-विजयदुर्ग मार्गावर वाडा गावात पाणी असल्याने हा मार्ग पूर्णतः बंद आहे.कुडाळ तालुक्यातील कुडाळ माणगाव खोरे मार्ग अंशतः बंद आहे. वेंगुर्ला तालुक्यातील वेंगुर्ला-शिरोडा मार्गावर आरवली पुलाचे काम सुरू आल्याने मार्ग पूर्णतः बंद आहे. विजयदुर्ग-वानिवडे रस्ता खराब झाल्याने रस्ता अंशतः बंद आहे. विजयदुर्ग-वाघोटण रस्त्यावर पाणी आल्याने मार्ग अंशतः बंद आहे. बुधवारी दुपारनंतर काही भागांत सूर्यदर्शन झाले. परिस्थिती पूर्वपदावर आली आहे.‘एनडीआरएफ’ची टीम जिल्ह्यात दाखलजिल्ह्यात वारंवार ‘रेड अलर्ट’ जारी केला जात असल्याने आणि अतिवृष्टी झाल्यास त्यावेळी बचावकार्य करण्यासाठी शासनाची ‘एनडीआरएफ’ची टीम सिंधुदुर्ग जिल्ह्यात बुधवारी सकाळी दाखल झाली आहे. ही टीम मालवण तालुक्यातील नम्रता मंगल कार्यालय कट्टा येथे ठेवण्यात आली आहे. संपूर्ण यंत्रणा यासाठी सज्ज ठेवण्यात आली आहे.३६ मिलिमीटर सरासरी पावसाची नोंद  झाली आहे. बुधवारी सकाळी आठ वाजेपर्यंत २८८ मि.मी. पाऊस पडला आहे. यात दोडामार्ग ११ मि.मी., सावंतवाडी १६ मि.मी., वेंगुर्ला १९ मि.मी., कुडाळ १६ मि.मी., मालवण २९ मि.मी., कणकवली २५ मि.मी., देवगड ७० मि.मी. आणि वैभववाडी १०२ मि.मी. समावेश आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गRainपाऊस