शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

गुजरातमधील सहा हायस्पीड ट्रॉलर्स पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2019 15:38 IST

मालवण : जिल्ह्याच्या सागरी जलधी क्षेत्रात परप्रांतीय हायस्पीड ट्रॉलर्सची घुसखोरी सुरूच आहे. त्यामुळे मत्स्य व्यवसाय विभागाने धडक कारवाई सुरू ...

ठळक मुद्देमालवणात मत्स्य विभागाची कारवाई अवैधरित्या मासेमारी करताना आढळले

मालवण : जिल्ह्याच्या सागरी जलधी क्षेत्रात परप्रांतीय हायस्पीड ट्रॉलर्सची घुसखोरी सुरूच आहे. त्यामुळे मत्स्य व्यवसाय विभागाने धडक कारवाई सुरू ठेवली असून बुधवारी येथील मत्स्य व्यवसाय विभागाच्या पथकाने सुमारे २० ते २१ वाव समुद्रात अवैधरित्या मासेमारी करताना आढळलेले गुजरातमधील सहा ट्रॉलर्स पकडले. हे सर्व ट्रॉलर्स येथील बंदरात आणण्यात आले आहेत.या ट्रॉलर्सवर मोठ्या प्रमाणात मासळी आढळून आली असून गुरुवारी सकाळी या मासळीचा लिलाव करण्यात येणार असल्याची माहिती मत्स्य परवाना अधिकारी श्रुतिका गावडे यांनी दिली.गेल्या दीड महिन्याच्या कालावधीत परप्रांतीय हायस्पीड ट्रॉलर्सनी अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. मासळीची मोठ्या प्रमाणात लूट होत असल्याने मच्छिमारांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत होती. त्यामुळे मत्स्य व्यवसाय विभागाने धडक कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. यात गेल्या महिनाभरात अवैधरित्या मासेमारी करणारे आठहून अधिक ट्रॉलर्स पकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. हायस्पीड ट्रॉलर्स पकडले जात असतानाही परप्रांतीय ट्रॉलर्सची घुसखोरी सुरूच राहिल्याने मत्स्य व्यवसाय विभागाने कारवाईची मोहीम अधिक तीव्र केली आहे.

येथील समुद्रात परप्रांतीय ट्रॉलर्सची घुसखोरी सुरू असल्याने बुधवारी सहायक मत्स्य व्यवसाय आयुक्त प्रदीप वस्त यांच्या मार्गदर्शनाखाली मत्स्य परवाना अधिकारी श्रुतिका गावडे यांच्यासह सागरी सुरक्षा पर्यवेक्षक दीपेश मायबा, पोलीस कर्मचारी पावसकर, खोत, तांडेल, नारायण हरचकर, अंकुश तोरसकर, राकेश नाटेकर यांचे पथक गस्तीनौकेद्वारे गस्त घालत असताना त्यांना २० वाव समुद्रात अनेक परप्रांतीय हायस्पीड ट्रॉलर्स अवैधरित्या मासेमारी करीत असल्याचे दिसून आले. या पथकाने कारवाई करीत गुजरातमधील सहा ट्रॉलर्स पकडले.यात मनसुख बाबूभाई भेंसाला यांच्या मालकीचा रुद्र गंगा आयएनडी जीजे-११ एमएम-२७५२, ईश्वर देवजी भेंसाला यांच्या मालकीचा श्री साई आयएनडी जीजे-११ एमएम-७३०६, कानजी शामजी डालकी यांच्या मालकीचा गंगा सागर आयएनडी जीजे-११-एमएम ८०१०, राधाबेन कृष्णचंद्र भेंसाला यांच्या मालकीचा शशी भूषण आयएनडी जीजे-११-एमएम-१२१४७, जयाबेन रमेशभाई फोफंदी यांच्या मालकीचा भक्ती पूजा आयएनडी जीजे-११-एमएम-३१९९, चेतनभाई कोटीया यांच्या मालकीचा भोला रैनू आयएनडी जीजे-११-१२७३५ हे सहा ट्रॉलर्स पकडून ते येथील बंदरात आणण्यात आले आहेत.यापुढेही धडक कारवाई सुरूच ठेवणारया सहाही हायस्पीड ट्रॉलर्सवर मोठ्या प्रमाणात मासळी आढळून आली आहे. गुरुवारी सकाळी या मासळीचा बंदरात लिलाव केला जाणार आहे. लिलावानंतर या हायस्पीड ट्रॉलर्सवर कारवाईसाठीचे प्रस्ताव तहसीलदारांकडे सादर केले जाणार आहेत, अशी माहिती मत्स्य परवाना अधिकारी श्रुतिका गावडे यांनी दिली.

महिला मत्स्य परवाना अधिकाऱ्याने केलेल्या या कारवाईचे मच्छिमारांकडून कौतुक होत आहे. आतापर्यंत केलेल्या कारवाईतील ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे दिसून आले आहे. यापुढेही ही कारवाई सुरुच ठेवण्यात येणार असल्याचे मत्स्य व्यवसाय विभागाने स्पष्ट केले आहे.

टॅग्स :fishermanमच्छीमारsindhudurgसिंधुदुर्ग