शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

नदीत आंघोळीला गेलेल्या भावंडांचा बुडून दुर्दैवी मृत्यू, बहीण सुदैवाने बचावली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2018 16:21 IST

पात्रात असलेल्या एका फायबर बोटीमधून त्यांनी डोहात जाण्याचा प्रयत्न केला. पण

सिंधुदुर्ग (मालवण) - गोठणे येथे आचरेकर कुटुंबियांवर काळाने घाला घातला. एकाच कुटुंबातील २ सख्खी भावंडे नदीत बुडाली.  मालवण येथील नदीच्या डोहोत बोटींग करत असताना बोट पलटल्याने झालेल्या अपघातात दोघा भावंडांचा बुडून मृत्यू झाला आहे. त्यांची बहीणही पाण्यात बुडाली होती मात्र ती सुदैवाने बचावली.  गोठणे आचरेकर स्टॉप येथील गोठणे कोंड नदीत ११ च्या सुमारास अंघोळी साठी आले असता ही  घटना घडली.

फायबर बोट उलटून ही दुर्घटना अशी माहिती मिळाली आहे. आचरेकर यांच्या घरापासून अवघ्या काही अंतरावर नदी आहे. नेहमी मुले येथे आंघोळीला जात होती. मयत सुवर्णा दशरथ आचरेकर वय (२३), आकाश दशरथ आचरेकर वय (१९)  तर दीपाली दशरथ आचरेकर (२२) हिला वाचवण्यात यश आले आहे. सदर घटने मुळे गोठणे गावात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या वृत्तानुसार, आचरेकर कुटुंबातील तीन भावंडे सकाळी कपडे धुण्यासाठी गेले होते. पात्रात असलेल्या एका फायबर बोटीमधून त्यांनी डोहात जाण्याचा प्रयत्न केला. पण बोट पलटी झाल्याने दोन भावंडे खोल डोहात बुडाली. दिपाली हिला पोहता येत असल्याने ती वाचली. तिने एका झुडपाचा आधार घेत स्वतःचा जीव वाचवला. मात्र दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतदेह बाहेर काढण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडे कोणतीही सुविधा नसल्याने अडचणी येत आहेत.