शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२९ पर्यंत मीच महाराष्ट्राचा CM, हेच कार्यक्षेत्र, दिल्ली अजून दूर”: देवेंद्र फडणवीस
2
मुंबईत महायुती, इतरत्र स्वतंत्र; मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट संकेत, विरोधकांवर जोरदार हल्लाबोल
3
निवडणूक आयोगाकडून आता देशभर SIRची तयारी; दिल्लीत दोन दिवसीय परिषद, अधिकाऱ्यांकडून आढावा
4
तेलावरून तापले राजकारण; ट्रम्प पुन्हा म्हणाले, भारत रशियन तेलाची खरेदी कमी करणार
5
मुंबईत महायुती एकत्र, काँग्रेसला सेना- मनसे नकोच; आयोगाच्या आदेशाआधीच नगरपालिकांसाठी तयारी
6
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर प्रतिबंध लादण्याचा प्रयत्न निंदनीय”: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
7
सरकारने केली शेतकरी, बेरोजगारांची फसवणूक: चेन्नीथला, काँग्रेसची राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा
8
रेल्वे अपघातात पती गमावला, तिने लढा दिला; २३ वर्षांनंतर ‘सुप्रीम’ निर्णयाने न्याय मिळाला
9
सुवर्णाची झळाळी, शिर्डी साईमंदिरात उत्साहात दिवाळी; २.५० कोटींच्या रत्नजडित दागिन्यांची आरास
10
चांदीत ८ दिवसांत २६ हजारांची घसरण; सोन्याच्या दरालाही मोठा फटका, १ दिवसात ११ हजारांनी उतरले
11
सत्या नाडेला यांना वार्षिक पगार ₹८४६ कोटी मिळणार; एआयमुळे दिली मायक्रोसॉफ्टला ओळख
12
AUS W vs ENG W : 'चारचौघी' स्वस्तात आटोपल्या; मग ऑस्ट्रेलियाच्या या दोघी इंग्लंडला पुरुन उरल्या!
13
बोगस नोंदणी विरोधात सत्ताधारी आमदाराची कोर्टात धाव; एकाच पत्त्यावर हजारो मतदार, काय आहे प्रकार?
14
पुतिन यांची 'खतरनाक हसीना' जागी झाली, जगातील गुप्तचर यंत्रणा सतर्क, काय आहे नवीन मिशन?
15
क्रॉस बॉर्डरवर भारताचा दबदबा वाढणार; ६ महिन्यात भारतीय सैन्यात सज्ज होणार '२० भैरव बटालियन'
16
उद्धव ठाकरे पुन्हा राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ' निवासस्थानी; अचानक भेटीमागचं 'राज'कारण काय?
17
भाजपाची नाराजी नको, एकनाथ शिंदे करणार कारवाई; रवींद्र धंगेकरांची शिंदेसेनेतून हकालपट्टी होणार?
18
१६०० वर्षांपासून हजारो लाकडाच्या खांबांवर उभं आहे युरोपमधील हे सुंदर शहर, असं आहे त्यामागचं गुपित
19
अमेरिका, ब्रिटनमध्ये पडझड, उद्या भारतात परिणाम दिसणार? सोने-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात कोसळणार  
20
Video: शिवरायांच्या वेशभूषेत फोटो काढण्यास वसई किल्ल्यावर रोखले; परप्रांतीय सुरक्षा रक्षकाचा प्रताप

सावंतवाडी कारागृहाला नवीन झळाळी, सिंधुमित्र प्रतिष्ठाने रंगरंगोटी करत बंदीवानांसाठी राबविले अनेक उपक्रम 

By अनंत खं.जाधव | Updated: April 24, 2024 14:14 IST

सावंतवाडी : कारागृहातील बंदिवानही समाजाचाच भाग असल्याची जाणीव ठेवत सावंतवाडी येथील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान या समाजसेवी संस्थेने निस्वार्थी ...

सावंतवाडी : कारागृहातील बंदिवानही समाजाचाच भाग असल्याची जाणीव ठेवत सावंतवाडी येथील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान या समाजसेवी संस्थेने निस्वार्थी वृत्तीने सावंतवाडीतील कारागृह वर्ग २ येथील बंदीवानांसाठी अनेक उपक्रम राबविले आहे.याच सामाजिक बांधिलकीतून प्रतिष्ठानने या कारागृहाच्या अनेक विभागांच्या रंगरंगोटीसाठी रंग उपलब्ध करून दिल्याने या कारागृहाचे रूप पालटून या कारागृहाला झळाळी प्राप्त झाली आहे. या कारागृहाचे पुरुष व महिला बंदीवानांचे बॅरेक आतून तसेच बाहेर, स्वयंपाकगृह सांस्कृतिक हॉल, गार्ड रूम यांची रंगरंगोटी करण्याची आवश्यकता होती. प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ प्रवीणकुमार ठाकरे यांनी याबाबत कारागृहाचे अधीक्षक संदीप एकशिंगे यांच्याकडे या कारागृहाच्या रंगरंगोटीसाठी रंग उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले. त्यानंतर कारागृहाच्या मागणीनुसार कारागृह परिसराच्या रंगकामासाठी लागलेला रंग  सिंधुमित्र प्रतिष्ठानच्यावतीने या कारागृहाला भेट स्वरूपात देण्यात आला.सिंधुमित्र प्रतिष्ठानने दिलेल्या रंगातून कारागृहातील पुरुष व महिला बंदीवानांचे बॅरेक आतून तसेच बाहेर, स्वयंपाकगृह सांस्कृतिक हॉल, गार्ड रूम, मुख्य प्रवेशद्वार परिसराची रंगरंगोटी करण्यात आली. कारागृहातील छोटेखानी पाटेकर देवालयाची रंगरंगोटी करून ते आकर्षक सजविण्यात आले. सुशोभीकरणामुळे कारागृहाचा हा परिसर प्रसन्न आणि आनंददायी बनला आहे. कारागृह अधीक्षक संदीप एकशींगे यांनी सिंधुमित्र प्रतिष्ठानच्या या अभिनव उपक्रमाचे कौतुक करून बंदीवानांच्या हितासाठी आवश्यक त्या नियमानुसार देय असलेल्या वस्तूंचा मोफत पुरवठा तसेच अनेक उपक्रम या संस्थेमार्फत राबवले जात असल्याचे सांगितले. तसेच तुरुंगाधिकारी संजय मयेकर यांनी  सिंधुमित्र प्रतिष्ठानचे आभार मानले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गSawantwadiसावंतवाडीjailतुरुंग