शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्गची रसिकता प्रतिष्ठानने समृद्ध केली : प्रसाद कांबळी यांचे गौरवोद्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 12:35 IST

वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानने गेली 27 वर्ष नाट्य चळवळ खऱ्या अर्थाने जीवंत ठेवली आहे. त्याचबरोबर नाट्यमहोत्सवात प्रायोगिक नाटके सादर करून सिंधुदुर्गची रसिकता समृद्ध केली आहे असे गौरवोद्गार अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी काढले .

ठळक मुद्दे सिंधुदुर्गची रसिकता प्रतिष्ठानने समृद्ध केली : प्रसाद कांबळी यांचे गौरवोद्गारआचरेकर प्रतिष्ठानच्या नाट्योत्सवाचे उद्घाटन

कणकवली : वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानने गेली 27 वर्ष नाट्य चळवळ खऱ्या अर्थाने जीवंत ठेवली आहे. त्याचबरोबर नाट्यमहोत्सवात प्रायोगिक नाटके सादर करून सिंधुदुर्गची रसिकता समृद्ध केली आहे असे गौरवोद्गार अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी काढले .कणकवली येथील वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या 27 व्या नाट्य महोत्सवाचे उद्घाटन प्रसंगी प्रसाद कांबळी बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.दिलीप पांढरपट्टे , आचरेकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष वामन पंडित, अ‍ॅड.नारायण देसाई आदी उपस्थित होते.प्रसाद कांबळी म्हणाले, रंगभूमीच्या ऊर्जितावस्थेसाठी रसिकांचे पाठबळ महत्वाचे आहे. त्यासाठी प्रतिष्ठानसारख्या नाट्य संस्था भक्कम व्हायला हव्यात. सर्व रंगकर्मीनी जबाबदारीने काम करून रंगभूमीचे महत्त्व टिकवायला हवे आणि नवीन पिढी रंगभूमीवर यायला हवी. त्याअनुषंगाने यापुढे प्रतिष्ठानच्या नाट्य महोत्सवात दरवर्षी एक व्यावसायिक नाटक सादर करण्याची जबाबदारी माझी असेल.मी सध्या नाट्य परिषदेचा अध्यक्ष आहे. एका वर्षात आम्ही दोन नाट्यसंमेलने आयोजित केली. आता 100 व्या नाट्यसंमेलनात प्रतिष्ठानचा सहभाग महत्त्वाचा असेल. रंगभूमीविषयी इथली माणसं निष्ठेने काम करतात. कोकणातला माणूस चोखंदळ नाट्यरसिक आहे. मुंबईतील नाट्य चळवळ त्यांच्यामुळेच जिवंत राहिली आहे.

डॉ.दिलीप पांढरपट्टे म्हणाले, कोकणी माणूस हा सगळ्याच कलेवर प्रेम करणारा माणूस आहे. तरीही त्यात त्याचे नाटकावर जास्त प्रेम आहे कोकणच्या सांस्कृतिक क्षेत्रात नाटकाचे मोठे स्थान आहे. आचरेकर प्रतिष्ठानमुळे उत्तमोत्तम नाटके येथे पाहायला मिळाली.वामन पंडित म्हणाले, वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानला जागा मिळवून देण्यात माजी जिल्हाधिकारी भूषण गगराणी यांचे योगदान मोठे आहे. त्यांनी आपल्या अधिकार्‍यासह नाट्यगृहासाठी ही आताची जागा शोधण्याचा प्रयत्न केला. आपल्या सारख्या चोखंदळ नाट्य रसिकांमुळे हा नाट्योत्सव 27 वर्षे चालू आहे. यापुढेही रसिकांचे असेच सहकार्य लाभावे. 

टॅग्स :cultureसांस्कृतिकsindhudurgसिंधुदुर्ग