शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

सिंधुदुर्गनगरी : विषय समिती सभापती निवडणूक कोरमअभावी रद्द

By admin | Updated: October 2, 2014 23:32 IST

जिल्हा परिषदेच्या सर्वच सदस्यांची सभेकडे पाठ

सिंधुदुर्गनगरी : जिल्हा परिषद विषय समिती सभापती पदांच्या निवडणुकीसाठी आज, गुरुवारी एकही उमेदवारी अर्ज भरण्यात आला नाही. तसेच निवडणूक प्रक्रियेसाठी बोलविण्यात आलेल्या खास सभेकडे जिल्हा परिषदेच्या सर्वच सत्ताधारी सदस्यांसह विरोधी पक्षांच्या सदस्यांनीही पाठ फिरविल्याने ही सभा पीठासन अधिकारी ज्ञानेश्वर खुटवड यांनी रद्द केली.जिल्हा परिषद समाजकल्याण सभापतिपदासह महिला व बालविकास सभापतिपद तसेच दोन विषय समिती सभापतिपदांची अडीच वर्षांची मुदत १ आॅक्टोबरला संपल्याने या पदांच्या नव्याने निवडीसाठी जिल्हा प्रशासनाने आज खास सभेचे आयोजन केले होते. या निवडणुकीसाठी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत उमेदवारी नामनिर्देशन पत्र भरावयाचे होते. मात्र, नियोजित वेळेत जिल्हा परिषद सदस्यांमधून एकाही उमेदवाराचे नामनिर्देशनपत्र प्राप्त न झाल्याने निवडणूक प्रक्रिया होऊ शकली नाही. निवडणूक प्रक्रियेसाठी जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात दुपारी तीन वाजता खास सभेचे आयोजन करण्यात आले होते. या निवडणुकीसाठी पीठासन अधिकारी म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर खुटवड, सभा सचिव तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील रेडकर, जी. आर. गावित, आदी उपस्थित होते. सत्ताधाऱ्यांनी अर्ज दाखल केला नाही, तर विरोधी पक्षाच्या सदस्यांनीही या पदांसाठी एकही नामनिर्देशनपत्र न भरल्याने अनपेक्षितरीत्या सत्ताधाऱ्यांना साथ मिळाली. विरोधी गटाच्या सदस्यांकडून एका पदासाठी जरी नामनिर्देशनपत्र सादर केले असते, तर सत्ताधाऱ्यांना या निवडणुकीला सामोरे जाण्याची वेळ आली असती. या निवडणुकीला सामोरे जाणे आणि इच्छुक सदस्यांच्या मोठ्या संख्येतून केवळ चार सदस्यांची निवड करणे जोखमीचे बनू शकले असते, असे बोलले जात आहे.काँग्रेसची रणनीतीजिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीवेळी सत्ताधारी सदस्यांमध्येच नाराजी पसरली होती. आताच्या निवडीमध्ये एखाद्या सदस्याला जरी सभापतिपद दिले, तरी इतर सदस्य नाराज होतील व त्याचा फटका विधानसभा निवडणुकीला बसेल याचा सारासार विचार करून आजची विषय समिती सभापतीची निवडणूक पुढे ढकलण्याची रणनीती जिल्हा काँग्रेसने अवलंबिली असल्याची चर्चा सुरू होती. पुन्हा निवडणूक होणारजिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापतिपदासाठी रद्द करण्यात आलेली आजची निवडणूक प्रक्रिया पुढील काही दिवसांनी केली जाणार आहे. त्यासाठी पुन्हा निवडणूक कार्यक्रम आखला जाणार आहे. (प्रतिनिधी)सदस्य प्रचारात : सावंतयाबाबत जिल्हा परिषद सदस्य सतीश सावंत यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपले सर्व पदाधिकारी, सदस्य निवडणुकीच्या प्रचारात गुंतल्याने तसेच आचारसंहितेमुळे निवड झालेल्या सदस्यांना आनंदोत्सव साजरा करता येणार नाही. यामुळे निवड न करता जिल्हा परिषद अध्यक्षांकडेच तूर्तास सर्व पदांचा कार्यभार सोपविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळेच निवड प्रक्रियेला सामोरे न जाण्याचा निर्णय घेत नामनिर्देशनपत्र दाखल केले नसल्याचे सांगितले.इतिहास घडला...जिल्हा परिषदेच्या इतिहासात निवडणूक प्रक्रिया रद्द होण्याची ही पहिलीच वेळ आहे. या निवडणुकीसाठी सत्ताधारी सदस्यांसह विरोधी सदस्यांनीही नामनिर्देशनपत्र सादर केले नाही. निवडणूक प्रक्रियेकडेच सर्वांनी पाठ फिरविली. त्यामुळे अखेर जिल्हा प्रशासनाला ही निवडणूक प्रक्रियाच तूर्तास रद्द करण्याची वेळ आली.