शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्गनगरी : अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 13:30 IST

सिंधुदुर्गनगरी : एक रूपयाचा कडीपत्ता सरकार झाले बेपत्ता..! अंगणवाडी कर्मचारी सभेचा विजय असो..! मानधन नको वेतन हवे... आदी विविध ...

ठळक मुद्देअंगणवाडी कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा एक रूपयाचा कडीपत्ता, सरकार झाले बेपत्ता, विविध मागण्यांचे निवेदन शासनाला सादर

सिंधुदुर्गनगरी : एक रूपयाचा कडीपत्ता सरकार झाले बेपत्ता..! अंगणवाडी कर्मचारी सभेचा विजय असो..! मानधन नको वेतन हवे... आदी विविध गगणभेदी घोषणा देत हजारो अंगणवाडी कर्मचाऱ्यां चा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. कामगार कायद्यात करण्यात येत असलेल्या बदलांना विरोध करणारे आणि आपल्या मागण्यांच्या निवेदन यावेळी शासनाला सादर करण्यात आले.अंगणवाडी कर्मचारी सभेच्या जनरल सेक्रेटरी कमल परुळेकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यां नी ओरोस श्री देव रवळनाथ मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला.

यावेळी शालिनी तारकर, दिपाली पठानी, सुरेखा भांडारकर, मंगला राणे, रोहिणी लाड,अर्चना गांधी, सुचिता पोळ, शीतल साळुंखे, माधवी ठाकुर, कांचन शेणई, कुंदना कावळे, गुलाब चव्हाण, सायली परब यांच्यासह हजारोंच्या संख्येने अंगणवाडी कर्मचारी या मोर्चात सहभागी झाल्या होत्या. यावेळी विविध घोषणा देत येथील परिसर दणाणून सोडला.देशातील श्रमिक कर्मचाऱ्यांच्या मुलभुत अधिकारांमध्ये कपात करून कॉर्पोरेट आणि मालकांना सोयीच्या तरतुदी करून सरकार कामगार कायद्यात बदल घडवित आहे. याला विरोध करण्यासाठी भारतातील सर्व कामगार व कर्मचारी संघटना समन्वय समितीने ८ व ९ जानेवारी या दोन दिवसांच्या देशव्यापी संपाची हाक दिली होती. त्यानुसार या संपात राज्यातील अंगणवाडी कर्मचारीही सहभागी झाले आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या ८ व ९ जानेवारी या दोन दिवस बंद आहेत. दरम्यान अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या या मोर्चाच्या सुरुवातीला विज वर्कस फेडरेशनचे प्रतिनिधी प्रदीप नेरूरकर आणि माजी आमदार परशुराम उपरकर यांनी भेट देत पाठींबा दिला.या आहेत प्रमुख मागण्यामहिला बालकल्याण व एकात्मिक बाल विकास योजना नियमित करावी, कर्मचाºयांना मानधना ऐवजी वेतन द्यावे, बोनस व भविष्य निर्वाह निधी द्यावा, रिक्त पदे भरावीत, कंत्राटीकरण रद्द करावीत, आजारपणाची भर पगारी रजा द्यावी, पेंशन मिळावी, सेवानिवृत्तीचा लाभ निवृत्तीच्याच दिवशी देण्यात यावा, इमारत भाडे वाढवून मिळावे, टीएचआर बंद करून स्थानिक ताजा आहार देण्याची व्यवस्था करावी, अंगणवाडी कर्मचारी भरती प्रक्रिया त्वरित सुरु करा. 

टॅग्स :Morchaमोर्चाsindhudurgसिंधुदुर्ग