शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

ओहोटीमुळे सिंधुदुर्ग किल्ले दर्शनाला फटका, बंदरजेटीकडे पाण्याची पातळी झाली कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 12:44 IST

पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला येणाऱ्या ओहोटीच्या परिणामामुळे मालवण बंदरजेटी येथे पाण्याची पातळी कमी झाल्याचा फटका सिंधुदुर्ग किल्ला दर्शनाच्या प्रवासी होड्यांना बसला. ओहोटीमुळे जेटीसमोर होड्या न लागल्याने शेकडो पर्यटकांना शनिवारी सायंकाळी सिंधुदुर्ग किल्ल्याच्या भेटीअभावी माघारी परतावे लागले.

ठळक मुद्देबंदरजेटीकडे पाण्याची पातळी झाली कमी होडी व्यावसायिक संघटनेची बंदर विभागावर नाराजीदोन दिवसांच्या सलग सुटीमुळे मालवणात पर्यटकांचा ओघ

मालवण ,दि.  ०६ :  पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला येणाऱ्या ओहोटीच्या परिणामामुळे मालवण बंदरजेटी येथे पाण्याची पातळी कमी झाल्याचा फटका सिंधुदुर्ग किल्ला दर्शनाच्या प्रवासी होड्यांना बसला. ओहोटीमुळे जेटीसमोर होड्या न लागल्याने शेकडो पर्यटकांना शनिवारी सायंकाळी सिंधुदुर्ग किल्ल्याच्या भेटीअभावी माघारी परतावे लागले.मालवणात दोन दिवसांच्या सलग सुटीमुळे पर्यटकांचा ओघ शुक्रवारपासून वाढला आहे. मालवणात आलेले पर्यटक सिंधुदुर्ग किल्ला दर्शनाबरोबर जलक्रीडा प्रकारांनाही पसंती देत आहेत. किल्ला दर्शनासाठी बंदर जेटी येथून होड्या सोडण्यात येतात.

शनिवारी आलेल्या ओहोटीमुळे बंदरजेटी किनारी समुद्राच्या पाण्याची पातळी कमी झाल्याने जेटीपर्यंत होड्या येणे कठीण बनले. त्यामुळे शेकडो पर्यटकांना सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाता आले नाही.

दर महिन्याच्या पौर्णिमेला म्हणजेच एकादशी ते संकष्टी आणि अमावास्येला एकादशी ते चतुर्दशी या चार दिवसांच्या कालावधीत समुद्राला आलेल्या ओहोटीमुळे बंदर जेटीजवळ पाण्याची पातळी घटल्याने किल्ला प्रवासी होड्या जेटीला लागत नाहीत.बंदर विभागाचा दुर्लक्षओहोटीचा मोठा फटका होडी व्यावसायिकांना बसतो. सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी होडी वाहतूक संघटनेने मेरिटाईम बोर्डाला सातत्याने बंदर जेटीजवळील गाळाचा उपसा करावा अशी मागणी केली होती. या मागणीकडे बंदर विभागाने सातत्याने दुर्लक्ष केला आहे, असा आरोप सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी होडी वाहतूक संघटनेने केला आहे.

 

टॅग्स :konkanकोकणFortगड