शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg ZP Election Voting 2026: हृदयविकारावर रुग्णालयात तीन दिवसापासून उपचार, 'आयसीयू'मधून येऊन बजावला मतदानाचा हक्क 

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: February 7, 2026 16:23 IST

'अशा दक्ष मतदारांमुळेच आपली लोकशाही जिवंत'

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी आज, शनिवारी सकाळपासूनच मतदानाला सुरुवात झाली आहे. मतदारांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. मतदानासाठी मतदान केंद्रावर नागरिकांनी रांगा लावल्या आहेत. परुळे मतदान केंद्रावर माधवी दाभोलकर या नववधूने पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावून लग्न मंडपात हजेरी लावली होती.अशातच सर्जेकोट येथील ज्येष्ठ मच्छीमार दादा सावजी यांनी थेट रुग्णालयातून आयसीयूमधून येऊन सर्जेकोट येथील मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यांच्या या धैर्याबद्दल याठिकाणच्या मतदान केंद्र अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी त्यांचे टाळ्या वाजवून कौतुक केले.दादा सावजी हे मालवणमधील एका खासगी रुग्णालयात हृदयविकाराच्या निदानामुळे तीन दिवसापासून आयसीयूमध्ये उपचार घेत आहेत. त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मतदान करण्याची इच्छा कुटुंबीयांकडे व्यक्त केली. संबंधित डॉक्टर यांची परवानगी घेऊन दादा सावजी यांना मालवणमधून सर्जेकोट येथील मतदान केंद्रावर आणण्यात आले. तेथे त्यांनी मतदानाचा हक्क बजावला. आजारी असूनही थेट रुग्णालयातून येऊन मतदान करण्याचे धैर्य दाखवल्या बद्दल याठिकाणच्या मतदान केंद्र अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी त्यांचे टाळ्या वाजवून कौतुक केले. सावजी यांनी आपल्या मतदान अधिकार कर्तव्य बद्दल दाखविलेल्या जागरूकतेमुळे सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे. तालुका निवडणूक अधिकारी श्रीमती शारदा पवार यांनी अशा दक्ष मतदारांमुळे, ज्यांना आपल्या राष्ट्रीय कर्तव्याची जाणीव आहे त्यामुळेच आपली लोकशाही जिवंत आहे. तसेच खासकरून सिंधुदुर्ग जिल्ह्यात १०० टक्के साक्षरता दर आहे तो अशा मतदारांमुळे सार्थकी ठरतो असे मत व्यक्त केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Sick voter discharged from ICU to vote in Sindhudurg election.

Web Summary : Despite heart issues, Dada Savji, hospitalized for three days, voted in Sindhudurg ZP election. Officials lauded his dedication to civic duty.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक २०२६sindhudurgसिंधुदुर्गVotingमतदानhospitalहॉस्पिटल