शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : हो... ऐन चतुर्थीत पूर्णपणे कॅशलेस एटीएम, गणेशोत्सवात तीन दिवसांत पैसेच नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 14:11 IST

कणकवली तालुक्यातील तळेरे येथील बँक आॅफ इंडिया आणि बँक आॅफ महाराष्ट्रच्या एटीएममध्ये पैसेच नाहीत. नो कॅश असा फलक तेथे लावण्यात आलेला असल्याने अनेक गणेशभक्त व चाकरमानी यांची गैरसोय होत आहे.

ठळक मुद्देगणेशोत्सवात गेल्या तीन दिवसांत पैसेच नाहीततळेरे येथील एटीएममधील स्थिती : अनेकांची होतेय गैरसोय

सिंधुदुर्ग : कणकवली तालुक्यातील तळेरे येथील बँक आॅफ इंडिया आणि बँक आॅफ महाराष्ट्रच्या एटीएममध्ये पैसेच नाहीत. नो कॅश असा फलक तेथे लावण्यात आलेला असल्याने अनेक गणेशभक्त व चाकरमानी यांची गैरसोय होत आहे.

एटीएम सेंटर असूनही त्यामध्ये पैसेच मिळत नसल्याने केंद्र शासनाच्या कॅशलेस योजनेची शंभर टक्के अंमलबजावणी करणारे हे आगळेवेगळे एटीएम सेंटर असल्याचे काहींनी बोलून दाखविले. यामुळे चाकरमानी गणेशभक्तांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे.तळेरे हे अनेकांसाठी सोयीचे ठिकाण आहे. बाजार, बँका व इतर अनेक कामांसाठी तळेरे बाजार हा सर्वांनाच सोईस्कर आहे. त्यासाठी तळेरे दशक्रोशीतील असंख्य ग्राहक व गणेशभक्त तळेरे बाजाराला पसंती देतात.

गणेशोत्सव, दिवाळी व मे महिन्यातील उन्हाळी सुटीत येणाऱ्या चाकरमानी व पर्यटकांची गैरसोय होऊ नये यासाठी तळेरे येथे बँक आॅफ इंडियाचे एटीएम सेंटर उघडण्यात आले. मात्र, ते ऐन हंगामात गैरसोयच करण्याचे काम करीत असल्याचे अनेकदा निदर्शनास येते. किंबहुना तसा अनेकांचा अनुभव असल्याचे अनेकांनी सांगितले.केंद्र शासनाच्या कॅशलेस योजनेनुसार देशातील हे पहिले एटीएम सेंटर असेल की जास्तवेळ या एटीएममध्ये पैसेच नसतात. म्हणजेच हे कॅशलेस एटीएम सेंटर असल्याने यामुळे अनेकांची प्रचंड गैरसोय होत आहे.गेल्या काही महिन्यांपासून अनेकांना या एटीएम सेंटरची माहिती असल्यामुळे शिवाय तळेरे हे ठिकाण सर्वांनाच सोईचे असल्याने या एटीएमवरच अनेकजण अवलंबून असतात. मात्र, ऐन गरजेच्यावेळी या एटीएममध्ये पैसे नसल्याने मोठी गैरसोय होते.या एटीएमच्या असल्या भोंगळ कारभारामुळे सर्वचजण त्रस्त झाले आहेत. यामुळे आपलेच पैसे वेळेवर मिळत नसतील तर असल्या सुविधाच बंद कराव्यात, अशीही चर्चा सुरू आहे.ग्राहकांमध्ये प्रचंड संतापविशेष म्हणजे दरवेळी अशा ऐन हंगामात या एटीएममध्ये पैसे नसतात किंवा तांत्रिक बिघाड झालेला असतो. मात्र, त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्यानेच सध्या असंख्य ग्राहकांची गैरसोय होत आहे. विशेष म्हणजे याकडे बँकेचे अधिकारीही लक्ष देत नसल्याने ग्राहकांमध्ये प्रचंड संताप आहे. अनेक ग्राहक मोठ्या आशेने या एटीएमकडे येतात आणि नो कॅशचा फलक बघून हताश होऊन जातात.तळेरे येथे बँक आॅफ महाराष्ट्र शाखेचे एटीएम सेंटर आहे. मात्र, आपल्या एटीएम कार्डच्या बँकेचे एटीएम असताना दुसऱ्या बँकेच्या सेंटरमधून पैसे का काढावेत? शिवाय, व्यवहार जास्त झाल्यास त्याचे शुल्क भरायचे कोणी? असे प्रश्न विचारले जात आहेत. 

टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८atmएटीएमsindhudurgसिंधुदुर्ग