शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
4
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
5
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
6
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
7
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
8
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
9
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
10
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
11
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
12
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
13
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
14
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
15
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
16
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
17
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

जय शिवाजी... सिंधुदुर्ग किल्ल्यावरील शिवराजेश्वर मंदिराचा होणार जीर्णोद्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2018 1:33 PM

शिवराजेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासंदर्भात जी मागणी खासदार संभाजीराजे यांनी केली होती. त्या मागणीला सर्व परवानग्या मंगळवारी पुरातत्व विभागाकडून देण्यात आल्या.

ठळक मुद्देशिवराजेश्वर मंदिराचे संवर्धनाचे काम सुरू होणारसंभाजीराजेंचा पाठपुरावा पुरातत्व खात्याची मंजुरी ; महानिदेशकांचे निर्देश

सिंधुुदुर्ग : छत्रपती शिवाजी महाराज यांचे सिंधुदुर्ग किल्ल्यावरील ऐतिहासिक शिवराजेश्वर मंदिराचे संवर्धन व जतन करण्याचे काम लवकर सुरु करण्यात यावे, ही मागणी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी भारतीय पुरातत्व विभागाकडे वेळोवेळी केली होती त्या संदर्भात मंगळवारी पुरातत्व विभागाच्या महानिदेशक उषा शर्मा यांनी बैठक बोलावली होती. या बैठकीत शिवराजेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासंदर्भात जी मागणी खासदार संभाजीराजे यांनी केली होती. त्या मागणीला सर्व परवानग्या मंगळवारी पुरातत्व विभागाकडून देण्यात आल्या.पुरातत्व खात्याच्या निगराणीखाली या मंदिराचे काम राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून लवकर सुरु केले जावे असे स्पष्ट निर्देश मंगळवारी संभाजीराजे यांच्या उपस्थितित उषा शर्मा यांनी दिले. यावेळी पर्यटन विभागाचे सचिव वाघमारे, रायगडचे जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी व पुरातत्व खात्याचे अधिकारी या बैठकीसाठी उपस्थित होते.भारत सरकारने सिंधुदुर्ग किल्ल्याला २१ जून २०१० रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय सरंक्षित स्मारक म्हणून घोषित केल्यानंतर या मंदिराच्या संवर्धनाचे जे काम होते ते ठप्प झाले होते. त्यामध्ये मंदिराच्या गाभाऱ्यातील काम, सभा मंडपाचे काम यासह बºयाच ठिकाणी मंदिरात पाण्याची गळती होते.यामुळे शिवप्रेमींकडून मंदिराच्या अवस्थेबद्दल नाराजी व्यक्त केली जात असल्याची बाब खासदार संभाजीराजे यांनी आॅगस्ट २०१७ मध्ये पुरातत्व विभागा बरोबर झालेल्या बैठकीत निदर्शनास आणून दिली होती. राज्य सरकारने वारंवार पुरातत्व विभागाशी पत्र व्यवहार करुन या मंदिराचे काम चालू करणे किती महत्वाचे आहे. पटवून दिले तरी सुद्धा या कामाला पुरातत्व खात्याकडून परवानगी मिळत नव्हती.पन्हाळगडावर लाईट अ‍ॅण्ड साउंडला मान्यतापुरातत्व विभागाबरोबर झालेल्या बैठकीत कोल्हापुर जिल्ह्यातील ऐतिहासिक व पर्यटनदृष्ट्या अत्यंत महत्वाच्या असलेल्या पन्हाळागडावर लाईट अ‍ॅण्ड साउंड शो सुरु करण्यास या बैठकीत तत्वत: मान्यता दिली.

 

टॅग्स :Sambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीsindhudurgसिंधुदुर्गFortगड