शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : शेतकऱ्यांसाठी राज्यसभेत आवाज उठविणार : नारायण राणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 14:24 IST

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाने पारदर्शक व भ्रष्टाचारमुक्त कारभार केल्यानेच या बँकेचा फायदा तळागाळातील जनतेला होत आहे. शेतकऱ्यांची पत निर्माण करणाऱ्या या जिल्हा बँकेला जिल्ह्याबाहेर व्यवसाय करण्यासाठी परवाना मिळावा यासाठी आपण प्रयत्न करणार असून शेतकऱ्यांच्या हितासाठी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्यासोबत राज्यसभेत आवाज उठविणार असल्याची ग्वाही खासदार नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना दिली.

ठळक मुद्देसिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या नूतन इमारतीचे उद्घाटनहसन मुश्रीफ, सतेज पाटील यांची उपस्थिती

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाने पारदर्शक व भ्रष्टाचारमुक्त कारभार केल्यानेच या बँकेचा फायदा तळागाळातील जनतेला होत आहे. शेतकऱ्यांची पत निर्माण करणाऱ्या या जिल्हा बँकेला जिल्ह्याबाहेर व्यवसाय करण्यासाठी परवाना मिळावा यासाठी आपण प्रयत्न करणार असून शेतकऱ्यांच्या हितासाठी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्यासोबत राज्यसभेत आवाज उठविणार असल्याची ग्वाही खासदार नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना दिली.सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या नूतन इमारतीच्या वास्तूचे उद्घाटन व नवीन पाच योजनांचा शुभारंभ नारायण राणे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी कोल्हापूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ, पद्मश्री डी. वाय. पाटील साखर कारखान्याचे अध्यक्ष आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, आमदार नीतेश राणे, जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, उपाध्यक्ष सुरेश दळवी, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, संचालक मंडळ आदी उपस्थित होते.डी. वाय. पाटील साखर कारखान्याला प्रारंभ करताना एकही राष्ट्रीय बँक कर्ज द्यायला तयार नव्हती. मात्र, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने कर्ज पुरवठा केला. आता त्याच राष्ट्रीय बँका आमच्या कारखान्याला रेड कार्पेट घालायला तयार झाल्या आहेत. मात्र, आम्ही जिल्हा बँकेलाच प्राधान्य देणार आहोत. असे आमदार सतेज पाटील यांनी सांगितले.यावेळी हसन मुश्रीफ यांनी जिल्हा बँकांना जिल्ह्यापुरते मर्यादित न ठेवता त्यांना शेड्युल्ड बँकेचा दर्जा मिळाला पाहिजे. यासाठी नारायण राणे यांनी दिल्लीत पाठपुरावा करावा, अशी विनंती केली.जिल्हा बँकेच्या नवीन पाच योजना जाहीरजिल्हा बँकेच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनाचे औचित्य साधून नावीन्यपूर्ण अशा पाच योजना जाहीर करण्यात आल्या. या योजनांमध्ये उद्योग व्यवसायासाठी दहा लाख रुपयांपर्यंत कर्ज देणे, पडीक जमिनीवर काजू व बांबू लागवडीसाठी आठ टक्क्यांपर्यंत कर्ज देणे, भाग्यलक्ष्मी वासरू संगोपन करणे, धनलक्ष्मी कुक्कुटपालन योजनेंतर्गत महिलांना पंधरा हजारांपर्यत कर्ज देणे आणि रिक्षा खरेदीसाठी विनातारण पतपुरवठा करणे अशा पाच योजना सुरू करण्यात आल्या. या योजनांच्या माहितीपत्रकाचे प्रकाशन करण्यात आले.

 

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Satej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलHassan Mianlal Mushrifहसन मियांलाल मुश्रीफsindhudurgसिंधुदुर्ग