शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
2
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
3
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
4
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
5
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
6
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
7
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
8
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
9
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
10
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
11
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
12
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
13
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
14
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
15
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
16
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
17
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
18
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
19
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
20
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश

उद्योग प्रशिक्षण केंद्रामुळे सिंधुदुर्ग तरुणांना नोकरी, व्यवसाय देणारा जिल्हा ठरणार - केंद्रीय मंत्री राणे

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: March 11, 2024 19:21 IST

सिंधुदुर्गनगरी येथील एमएसएमई विभागाचे प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीचे भूमिपूजन

सिंधुदुर्ग : भारत सरकारच्या या आधुनिक उद्योग प्रशिक्षण केंद्रामुळे भविष्यात सिंधुदुर्ग जिल्हा तरुणांना नोकरी देणारा आणि व्यवसाय देणारा जिल्हा ठरेल असा विश्वास केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केला. ते एमएसएमई विभागाच्या प्रशिक्षण केंद्राच्या भूमिपूजन व शिलान्यास कार्यक्रमांत बोलत होते.सिंधुदुर्गनगरी येथील एमएसएमई विभागाचे प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीचे भूमिपूजन, शिलान्यास केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी खासदार नीलेश राणे, केंद्रीय उद्योग मंत्रालयाचे अपर सचिव तथा विकास आयुक्त डॉ. रजनीश, दिल्ली येथील सुधा केसरी, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हाधिकारी किशोर तावडे, पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, माजी आमदार राजन तेली, माजी आमदार अजित गोगटे, एमएसएमई मंत्रालयाचे नागपूर येथील संचालक पी. एम. पार्लेवार आदी उपस्थित होते.

सुरुवातील केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते विविध भूमिपूजन करण्यात आले. त्यानंतर या प्रशिक्षण केंद्राच्या इमारत भूमिपूजन शिलान्यासचे अनावरण करण्यात आले. तदनंतर दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.यावेळी केंद्रीय उद्योग मंत्रालयाचे अपर सचिव तथा विकास आयुक्त डॉ. रजनीश म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नवीन उद्योजकांना घडविण्यासाठी व जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी भारत सरकारचे आधुनिक उद्योग प्रशिक्षण केंद्र या जिल्ह्यात सिंधुनगरीत होत आहे. या प्रशिक्षण केंद्रावर १६५ कोटी २८ लाख भारत सरकार खर्च करणार आहे. पीएम विश्वकर्मा हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संकल्पना देशभर राबविली जात असताना या योजनेला आणखी बळकटी देण्यासाठी सिंधुदुर्गातील तरुण-तरुणींना आधुनिक प्रशिक्षण देणाऱ्या या प्रशिक्षण केंद्राचा भूमिपूजन सोहळा सोमवारी केंद्रीय सूक्ष्म लघू मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते झाला आहे.

समाजाच्या विकासासाठी प्रयत्नकेंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले, सिंधुदुर्गनगरी येथे उभे राहत असलेल्या आधुनिक उद्योग प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून तरुण-तरुणींना विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षण नंतर त्यांना योग्य अशा ठिकाणी नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. या प्रशिक्षण केंद्रामुळे जिल्ह्याच्या बाहेर जाणार युवक जिल्ह्यातच थांबणार आहे. आपल्या बरोबर समाजाचाही विकास व्हावा अशी आपली धारणा असून आपल्या कार्यकर्त्यांनी आपल्या सोबतच समाजाचाही विकास व्हावा यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहनदेखील मंत्री राणे यांनी यावेळी केले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गNarayan Raneनारायण राणे