शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : दोडामार्ग तालुक्यात हत्ती हटाव मोहीम राबवणार : विकास खरगे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 14:34 IST

कर्नाटकमधील पथकाच्या माध्यमातून दोडामार्ग भागात स्थिरावलेल्या हत्तींना पकडण्यासाठी तत्काळ मोहीम राबवा. तसेच कर्नाटकातील वनपथकाला संपर्क करा, असे आदेश राज्याचे प्रधान वनसचिव विकास खरगे यांनी कोल्हापूर मुख्य वनसंरक्षक यांना दिले आहेत.

ठळक मुद्देदोडामार्ग तालुक्यात हत्ती हटाव मोहीम राबवणार : विकास खरगेराजन तेली यांनी घेतली वनसचिवांची भेट

सावंतवाडी : कर्नाटकमधील पथकाच्या माध्यमातून दोडामार्ग भागात स्थिरावलेल्या हत्तींना पकडण्यासाठी तत्काळ मोहीम राबवा. तसेच कर्नाटकातील वनपथकाला संपर्क करा, असे आदेश राज्याचे प्रधान वनसचिव विकास खरगे यांनी कोल्हापूर मुख्य वनसंरक्षक यांना दिले आहेत.

माजी आमदार राजन तेली यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेतली. त्यानंतर वनसचिवांसोबत झालेल्या बैठकीत हे आदेश देण्यात आले आहेत. हत्तीबाधितांना वाढीव नुकसान भरपाईही देण्याबाबत सरकार विचार करत असल्याचे तेली यांनी स्पष्ट केले.माजी आमदार राजन तेली यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेतली व हत्तींचा प्रश्न त्यांच्याकडे मांडला. तसेच दोडामार्ग येथे हत्तींपासून होणारी नुकसानी तत्काळ थांबवली जावी यासाठी शेतकऱ्यांनी उपोषण केले होते. त्याची माहितीही वनमंत्री यांना दिली. त्यानंतर वनमंत्री मुनगंटीवार यांच्या निर्देशानुसार वनसचिव खरगे यांनी बैठक घेतली.

या चर्चेत हत्तींपासून होणाऱ्या नुकसानामुळे त्रस्त झालेल्या हेवाळे-घाटीवडे व बांबर्डे भागातील लोकांकडून आंदोलन करण्यात आले होते. यात हत्तींपासून होणारी नुकसान भरपाई वाढवून देण्यात यावे, हत्तींना तत्काळ पकडण्यात यावे, हत्तींचा प्रतिबंध करण्यासाठी आवश्यक असलेले फटाके व इतर साहित्य पुरविण्यात यावे, आपत्कालीन परिस्थितीसाठी वनविभागाकडून मनुष्यबळ पुरविण्यात यावे, शंभर टक्के अनुदानावर सौरकुंपण उभारण्यास परवानगी देण्यात यावी अशा विविध मागण्या करण्यात आल्या होत्या.या पार्श्वभूमीवर तेली यांनी मुनगंटीवार यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेत प्रधान सचिव खरगे उपस्थित होते. या बैठकीत मुनगंटीवार यांनी सर्व मागण्या मान्य केल्या. नुकसान भरपाई वाढवून देण्यासंदर्भात आवश्यक असलेला प्रस्ताव कोल्हापूरचे मुख्य संरक्षक पाटील यांना तत्काळ सादर करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच मागण्यांबाबत सकारात्मक विचार करण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. 

टॅग्स :forest departmentवनविभागsindhudurgसिंधुदुर्गRajan Teliराजन तेली