शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : वझरेत मनोरा उभारण्यावरून दोन गट भिडले, आठ जण जखमी : पाळ, कोयत्याचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 17:45 IST

वझरे येथे दूरसंचार मोबाईल मनोरा उभारण्यावरून दोन गटात सुरू असलेला वाद शुक्रवारी चांगलाच उफाळून आला. मनोरा उभारण्याच्या विरोधात असलेला गट आणि समर्थक गटात पाळ, कोयत्याने तुंबळ हाणामारी झाली. यात दोन्ही गटाचे मिळून आठ जण जखमी झाले. अनेकांची डोकी फुटली. त्यापैकी सात जणांना म्हापसा-गोवा येथे उपचारासाठी हलविण्यात आले असून, जमखींमध्ये दोन वृध्द महिलांचाही समावेश आहे.

ठळक मुद्देवझरेत मनोरा उभारण्यावरून दोन गट भिडलेआठ जण जखमी : पाळ, कोयत्याचा वापर

दोडामार्ग : वझरे येथे दूरसंचार मोबाईल मनोरा उभारण्यावरून दोन गटात सुरू असलेला वाद शुक्रवारी चांगलाच उफाळून आला. मनोरा उभारण्याच्या विरोधात असलेला गट आणि समर्थक गटात पाळ, कोयत्याने तुंबळ हाणामारी झाली. यात दोन्ही गटाचे मिळून आठ जण जखमी झाले.

अनेकांची डोकी फुटली. त्यापैकी सात जणांना म्हापसा-गोवा येथे उपचारासाठी हलविण्यात आले असून, जमखींमध्ये दोन वृध्द महिलांचाही समावेश आहे. दरम्यान, दोडामार्ग पोलीस ठाण्यात दोन्ही गटांकडून परस्पर विरोधी तक्रारी दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.    

      

दोन्ही गटांचे प्रशासनाकडे निवेदनवझरे-काळकेकरवाडी येथे मोबाईल मनोरा प्रस्तावित आहे. सध्या या मनोऱ्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र, मनोरा उभारण्यावरून दोन गटात मतभेद आहेत. विरोधात असलेल्या गटाच्या म्हणण्यानुसार लोकवस्तीत मनोरा बांधू नये. तो अन्यत्र बांधावा. तर समर्थनार्थ असलेल्या गटाची मोबाईल मनोरा गावात होणे आवश्यक असल्याने तो मंजूर जागेतच उभारला जावा, अशी भूमिका आहे.

दोन्ही गटांनी चार दिवसांपूर्वी तहसील व पोलीस प्रशासनाला निवेदन देऊन आपापली भूमिका स्पष्ट केली होती. मात्र, त्यावर प्रशासनाने तोडगा न काढल्याने हा वाद दोन्ही गटांदरम्यान धुमसत होता. अखेर शुक्रवारी हा वाद उफाळून आला.मोबाईल मनोरा उभारण्याच्या विरोधात असणाऱ्या गटातील एका युवकाने समर्थनार्थ असणाऱ्या गटातील एका युवकाला व्हॉटस्अपच्या माध्यमातून मारण्याची धमकी दिली. त्याचा जाब विचारण्यासाठी समर्थक गटातील ग्रामस्थ गेले असता विरोधी गटातील ग्रामस्थांनी पाळ, कोयत्याने त्यांना मारहाण करण्यास सुरूवात झाली.

या मारामारीत अनेकांची डोकी फु टली. आणि दोन्ही गटातील आठ जण जखमी झाले. त्यापैकी रमेश बाबणी काळकेकर (३०), घन:शाम बुधाजी काळकेकर (४९), आनंदी आनंद उसपकर (६०), दशरथ ढोकळा गवस (६५), गोपी महादेव गवस (४०), प्रितम दशरथ गवस (३०), शुभम गोपी गवस (२४) या सात जणांच्या डोके व पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना म्हापसा-गोवा येथे उपचारासाठी पाठविण्यात आले. तर कौशल्या दशरथ गवस (५५) यांच्यावर दोडामार्ग ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीsindhudurgसिंधुदुर्ग