शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : समुद्रात बुडाला ट्रॉलर, सतरा खलाशांना सुखरूप आणण्यात यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 13:53 IST

मासेमारी करून परतताना आचरा-पिरावाडी येथील समुद्रातील नस्तानजीक मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास एक ट्रॉलर बुडाल्याची घटना घडली. या ट्रॉलरवरील सतरा खलाशांना दोरीच्या साह्याने किनार्‍यावर सुखरूप आणण्यात आले.

ठळक मुद्देआचरा-पिरावाडी येथील समुद्रात ट्रॉलर बुडाल्याची घटनासतरा खलाशांना सुखरूप आणण्यात यश

आचरा : मासेमारी करून परतताना आचरा-पिरावाडी येथील समुद्रातील नस्तानजीक मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास एक ट्रॉलर बुडाल्याची घटना घडली. या ट्रॉलरवरील सतरा खलाशांना दोरीच्या साह्याने किनार्‍यावर सुखरूप आणण्यात आले.दहा तासाच्या अथक प्रयत्नानंतर सकाळी हा ट्रॉलर किनार्‍यावर आणण्यात यश मिळाले. हडी येथील रियान अझीज शेख यांच्या मालकीचा हा ट्रॉलर असून यात त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.दरम्यान या ट्रॉलरला ट्रॉलिंग पद्धतीने मासेमारी करण्याचा परवाना असताना त्यांच्याकडून पर्ससीनच्या जाळ्यांचा वापर करून मासेमारी केली जात असल्याचे दिसून आल्याने याची मत्स्यव्यवसाय विभागाने सखोल चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी स्थानिक पारंपरिक मच्छीमारांनी केली आहे.गेले काही दिवस समुद्रात किमती मासळी मोठ्या प्रमाणात मिळत आहे. त्यामुळे हडी येथील रियान शेख यांच्या मालकीचा ट्रॉलर गेले दोन दिवस समुद्रात मासेमारीसाठी गेला होता.

मध्यरात्री हा ट्रॉलर मासेमारी करून परतत असताना आचरा पिरावाडी येथील समुद्रात नस्तानजीक सुकतीमुळे कलंडला. ट्रॉलरवर मोठ्या प्रमाणात मासळी व जाळी असल्याने समुद्राचे पाणी आत घुसल्याने तो बुडाला. ट्रॉलरवरील खलाशांनी याची माहिती किनार्‍यावरील सहकार्‍यांना दिली.त्यानुसार रियान मुजावर, किशोर तोडणकर, ग्रामपंचायत सदस्य चावल मुजावर, आसिफ मुजावर, फिरोज मुजावर, बुधाजी पाटील, प्रमोद पाटील यांच्यासह पिरावाडी, जामडूल, हिर्लेवाडी येथील ग्रामस्थांनी किनार्‍यावर धाव घेतली.

यातील काहींनी दोरीच्या साह्याने ट्रॉलरवरील सतरा खलाशांना बाहेर काढले त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. मध्यरात्रीपासून हा ट्रॉलर वाचविण्यासाठी मच्छीमारांचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते.दहा तासांच्या अथक प्रयत्नानंतर हा ट्रॉलर किनार्‍यावर काढण्यात यश मिळाले. यात ट्रॉलरचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच आचरा पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी अक्षय धेंडे, फरांदे यांनी घटनास्थळी जात माहिती घेतली. मत्स्यव्यवसायचे अधिकारी मात्र घटनास्थळी दाखल झालेले नव्हते. 

टॅग्स :Accidentअपघातsindhudurgसिंधुदुर्ग