शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : जात पडताळणी समितीसारखे देशात दुसरे भ्रष्ट काहीही नाही : विश्वनाथ म्हाडेश्वर यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 12:41 IST

आम्हांला दर ५ वर्षांनी निवडणुकीच्या परीक्षेला बसावे लागते. माझे आजपर्यंत अनेक सत्कार झाले, परंतु हा सत्कार वैश्य समाजाने केलेला असल्यामुळे तो मला महत्त्वाचा वाटतो, असे मत मुंबईचे महापौर विश्वनाथ म्हाडेश्वर यांनी व्यक्त केले. जात पडताळणी समितीसारखे देशात दुसरे भ्रष्ट काहीही नाही. हा आम्हांला आलेला अनुभव आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

ठळक मुद्देजात पडताळणी समितीसारखे देशात दुसरे भ्रष्ट काहीही नाही : विश्वनाथ म्हाडेश्वर यांची टीका वैश्य समाज बांधवांच्यावतीने कणकवली येथील आचरेकर प्रतिष्ठान येथे सत्कार समारंभ

कणकवली : आम्हांला दर ५ वर्षांनी निवडणुकीच्या परीक्षेला बसावे लागते. माझे आजपर्यंत अनेक सत्कार झाले, परंतु हा सत्कार वैश्य समाजाने केलेला असल्यामुळे तो मला महत्त्वाचा वाटतो, असे मत मुंबईचे महापौर विश्वनाथ म्हाडेश्वर यांनी व्यक्त केले. जात पडताळणी समितीसारखे देशात दुसरे भ्रष्ट काहीही नाही. हा आम्हांला आलेला अनुभव आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.वैश्य समाज बांधवांच्यावतीने येथील आचरेकर प्रतिष्ठान येथे मुंबई महानगरपालिकेचे महापौर विश्वनाथ म्हाडेश्वर यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. वैश्य समाजाच्यावतीने सिंधुदुर्ग वैश्यभूषण पुरस्कार विश्वनाथ म्हाडेश्वर यांना देण्यात आला. यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, मानपत्र व पुष्पहार घालून म्हाडेश्वर यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, नूतन नगराध्यक्ष समीर नलावडे, भाजपचे प्रदेश चिटणीस राजन तेली, विजयानंद पेडणेकर, कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर, बाळा भिसे, जिल्हा परिषद सदस्य संजय पडते, अ‍ॅड. दीपक अंधारी आदी उपस्थित होते.समाज बांधवांना मार्गदर्शन करताना विश्वनाथ म्हाडेश्वर म्हणाले की, समाजात एकी निर्माण करा. आपापसात दुश्मनी न करता सलोख्याचे संबंध ठेवा. राजकीय हेवेदावे विसरून समाजासाठी एकत्र या, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी काँग्रेस नगरसेवकाने राधानगरी येथे आपल्या केलेल्या सत्काराची आठवण त्यांनी करून दिली. तो कोणत्या पक्षात आहे हे महत्त्वाचे नसून तो आपल्या समाजाचा आहे. याची जाणीव प्रत्येकाने ठेवा व समाजावर प्रेम करा, असे आवाहन त्यांनी केले.संदेश पारकर म्हणाले, आपण सर्वजण वैश्य समाजाचे आहोत याचे भान ठेवून काम करा. आपली मुले मोठी व्हावीत ही जिद्द बाळगा, असे सूचित केले. अ‍ॅड. दीपक अंधारी यांनी प्रास्ताविक केले.

यावेळी समीर नलावडे, नगरसेवक मेघा गांगण, सुप्रिया नलावडे, मानसी मुंज, रुपेश नार्वेकर, सुनील कोरगावकर, नितीन कोरगावकर, महेश अंधारी, बाळासाहेब बोर्डवेकर, जिल्हा परिषद सदस्य संजय पडते, प्रदीप नारकर, गणेश कुशे यांचा विश्वनाथ म्हाडेश्वर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर यांचाही सत्कार करण्यात आला. तसेच प्रमोद जठार, राजन तेली, विजयानंद पेडणेकर, संदेश पारकर, बाळा भिसे, अ‍ॅड. दीपक अंधारी यांनाही गौरविण्यात आले. 

टॅग्स :Mumbaiमुंबईsindhudurgसिंधुदुर्ग