शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : संविधान जाळणाऱ्यांवर कडक कारवाई करा, मुणगेकर यांच्या नेतृत्वाखाली निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 11:54 IST

संविधान जाळणाऱ्यांवर व आंबेडकरविरोधी घोषणा देणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी बौद्ध सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी यांच्याकडे निवेदन देऊन केली. माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांच्या नेतृत्वाखाली बौद्ध सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी येथील पोलीस ठाण्याला भेट देऊन शिवाजी कोळी यांच्याकडे निवेदन सादर केले.

ठळक मुद्देसंविधान जाळणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणीभालचंद्र मुणगेकर यांची उपस्थिती : बौद्ध सेवा संघाचे पोलीस निरीक्षकांना निवेदन

कणकवली : संविधान जाळणाऱ्यांवर व आंबेडकरविरोधी घोषणा देणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी बौद्ध सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी यांच्याकडे निवेदन देऊन केली. माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांच्या नेतृत्वाखाली बौद्ध सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी येथील पोलीस ठाण्याला भेट देऊन शिवाजी कोळी यांच्याकडे निवेदन सादर केले.येथील बौद्धविहार येथे बौद्ध सेवा संघाचे कार्यकर्ते सकाळी मोठ्या संख्येने जमले. त्याठिकाणी विचारविनिमय करून पोलिसांना निवेदन देण्याचा निर्णय घेण्यात आला.

या बैठकीला माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर, बौद्ध सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष संदीप कदम, सहसचिव प्रदीप सर्पे, चर्मकार समाजाचे तालुकाध्यक्ष सुजित जाधव, डॉ. व्ही. जी. कदम, बौद्ध सेवा समिती मालवणचे तालुकाध्यक्ष संजय कदम, सचिन तांबे, दर्पण प्रबोधिनीचे सचिव आनंद तांबे, प्रज्ञा सर्पे, माजी नगरसेवक गौतम खुडकर, पंचायत समिती सदस्य गणेश तांबे, सिध्दार्थ तांबे, संदीप विलास कदम, सुभाष वरवडेकर, सुहास कदम, अनिकेत पवार, नरेंद्र तांबे, रवींद्र तांबे, किरण कदम, किशोर कदम, बाबुराव सावडावकर, संदीप तांबे, अशोक कांबळे, अजय तांबे, संतोष कांबळे, महेंद्र पवार, नारायण जाधव, प्रसाद जाधव, अमित जाधव, गौरव कदम, सचिन कासले आदी उपस्थित होते.दिल्ली येथे भारतीय संविधानाची प्रत जाळून महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविरोधात घोषणा देण्यात आल्या. हा गुन्हा असल्याचे बौद्ध सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अपमानित करणाऱ्या या समाजकंटकांविरोधात गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी बौध्द सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी यांना देण्यात आलेल्या निवेदनावर बौध्द सेवा संघाच्या ५३ पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत. 

टॅग्स :Bhalchandra Mungekarभालचंद्र मुणगेकरsindhudurgसिंधुदुर्ग