शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
2
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
3
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
4
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
5
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
6
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
7
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
8
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
9
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
10
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
11
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
12
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
13
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
14
'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार
15
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
16
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
17
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
18
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
19
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
20
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण

सिंधुदुर्ग : डेंग्युच्या पार्श्वभूमिवर आरोग्याची काळजी घ्या : कुबेर मिठारी यांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 13:25 IST

सध्या पावसाने विश्रांती घेतली असून कड़क ऊन पड़त आहे. तापसरीच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. तर कणकवली तालुक्यात डेंग्यूचे रुग्णही आढळत आहेत.

ठळक मुद्देडेंग्युच्या पार्श्वभूमिवर आरोग्याची काळजी घ्या कुबेर मिठारी यांचे आवाहन

कणकवली : सध्या पावसाने विश्रांती घेतली असून कड़क ऊन पड़त आहे. तापसरीच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. तर कणकवली तालुक्यात डेंग्यूचे रुग्णही आढळत आहेत. त्यामुळे या पार्श्वभूमिवर कोणत्याही प्रकारचा ताप येत असल्यास रुग्णांनी घाबरुन न जाता त्वरीत शासकिय रुग्णालयात उपचार घ्यावेत आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी .असे आवाहन कणकवली तालुका आरोग अधिकारी डॉ. कुबेर मिठारी यांनी केले आहे.सध्या तापसरीचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून तालुक्यात आरोग्य विभागाकडून सर्व्हे केला जात आहे. उपचार करूनही ताप कमी न होत असलेल्या रुग्णाच्या रक्ताच्या नमुन्याची चाचणी केली जात आहे. यामध्ये काही रुग्णांचा रक्त नमुना डेंग्यू पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे.त्यामुळे नागरिकांमध्ये काहीसे भितीचे वातावरण पसरले आहे. मात्र, नागरिकांनी घाबरुन न जाता वेळीच योग्य ते उपचार घ्यावेत. शासकीय यंत्रणा त्यासाठी सज्ज आहे. त्याचप्रमाणे डेंग्यूची लक्षणे काय असतात ? व डेंग्यू होऊ नये यासाठी काय काळजी घ्यावी ? तसेच डेंग्यू झाल्यास घ्यावयाचे उपचार याबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. त्यामुळे या मार्गदर्शनाचा लाभ घेऊन सुरक्षिततेचे उपाय नागरिकांनी अवलंबावे.रोग प्रसार कसा होतो?डेंग्यू हा आजार कोणत्याही व्यक्‍तीला होऊ शकतो. मात्र, प्रामुख्याने लहान मुलांना डेंग्यू संसर्गाचा धोका अधिक असतो. 'एडिस एजिप्टाय' या डासांची पैदास मोठ्या प्रमाणात होणाऱ्या पावसाळ्यामध्ये सामान्यपणे डेंग्यू तापाची सुरुवात होताना दिसते. हा डास दिवसा चावणारा असून, या तापाचा प्रसार मानव-डास-मानव असा असतो. या डासांची उत्पत्ती घरातील व परिसरातील भांडी, टाक्‍या व टाकावू वस्तू यात साठवलेल्या स्वच्छ पाण्यात होते. त्यामुळे त्याबाबत काळजी घेणे आवश्यक आहे.डेंग्यूची सर्वसाधारण लक्षणे !अचानक थंडी वाजणे , ताप येणे. डोके दुखणे, स्नायू व सांधे दुखणे, अतिशय थकवा येणे , भूक न लागणे , बद्धकोष्ठ, तोंडाची चव बदलणे, पोटात कळ येणे, जांघेत दुखणे, घसा खवखवणे, नैराश्‍य येणे,रुग्ण प्रकाशाकडे बघू न शकणे, सतत झोप येणे , अस्वस्थ वाटणे अशी सर्व साधारण लक्षणे रुग्णात आढळतात.डेंग्यूह्ण हा संसर्गजन्य आजार असून, वारंवार येणारा ताप, अंगदुखी व डोकेदुखी ही त्याची प्रमुख लक्षणे आहेत.डेंग्यूचा ताप हा जीवघेणा ठरू शकतो. त्यामुळे वेळीच उपचार घेणे आवश्यक आहे. डेंग्यू हा लहान मुलांमध्ये जास्त प्रमाणात आढळतो. कारण त्यांच्यात रोग प्रतिकारकशक्‍ती कमी असते.डेंग्यू वरील उपाय!रुग्णास तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावे. जर ताप 102 पेक्षा जास्त असेल तर मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या रुग्णाच्या डोक्यावर ठेवाव्यात. स्वच्छ ओल्या कापडाने शरीर पुसून घ्यावे. द्रव पदार्थ भरपूर प्रमाणात द्यावेत.फळांमध्ये पपई, किवी अशी फळे रुग्णास खाण्यास द्यावीत. तसेच वेळेवर औषधोपचार करावेत.प्रतिबंधात्मक उपाय योजनाडेंग्यू व रक्‍तस्रावी डेंग्यू ताप पसरवणारे एडिस एजिप्टाय हे डास घरात व घराभोवती असतात. त्यामुळे कीटकनाशके फवारून घ्यावीत. झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा. घराच्या दारे व खिडक्‍यांना तांबे किंवा ब्रॉंझच्या जाळ्या बसवाव्यात. शेतकऱ्यांनी शेतात भात कापणीच्या वेळी विशेष काळजी घ्यावी. असेही डॉ. कुबेर मिठारी यांनी सांगितले.

टॅग्स :dengueडेंग्यूsindhudurgसिंधुदुर्ग