शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : आंजिवडे-पाटगाव रस्त्याचे सर्वेक्षण, वनविभागाचे आदेश : उपवनसंरक्षकांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 17:11 IST

सोनवडे घाटमार्गाचे काम प्रगतीपथावर असतानाच आता सिंधुदुर्गमधील आंजिवडे व कोल्हापूर जिल्ह्यातील पाटगाव रस्त्याचे सर्वेक्षण करण्याचे आदेश सिंधुदुर्गचे उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

ठळक मुद्देआंजिवडे-पाटगाव रस्त्याचे सर्वेक्षणवनविभागाचे आदेश : उपवनसंरक्षकांची माहिती

सिंधुदुर्ग : सोनवडे घाटमार्गाचे काम प्रगतीपथावर असतानाच आता सिंधुदुर्गमधील आंजिवडे व कोल्हापूर जिल्ह्यातील पाटगाव रस्त्याचे सर्वेक्षण करण्याचे आदेश सिंधुदुर्गचे उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

याबाबतची संयुक्त बैठक सिंधुदुर्ग उपवनसंरक्षक कार्यालयात पार पडली. या बैठकीला बांधकाम अधिकाऱ्यांसह हा रस्ता व्हावा म्हणून तयार करण्यात आलेल्या समितीचे पदाधिकारीही उपस्थित होते.माणगावहून कोल्हापूरला जाण्यासाठी एकदम जवळचा मार्ग म्हणून आंजिवडे-पाटगाव रस्त्याकडे पाहिले जाते. या रस्त्यामुळे खऱ्या अर्थाने सिंधुदुर्गहून कोल्हापूरकडे जाण्यासाठी कमी वेळ लागणार आहे.

या मार्गात आंजिवडे ते धुरेवाडीपर्यंत फक्त अडीच किलोमीटरचा रस्ता वन विभागात येतो. त्यामुळे याचा परिपूर्ण प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्याबाबत बैठकीत चर्चा झाली आहे.हा रस्ता व्हावा यासाठी माणगाव येथील किशोर शिरोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली एक समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीची येथील उपवनसंरक्षक कार्यालयात बैठक झाली.

या बैठकीत उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांनी बांधकाम अधिकाऱ्यांकडून रस्त्याबाबत माहिती घेतली. त्यानंतर वनविभाग या रस्त्याचा सर्व्हे करेल, असे सांगितले. त्याप्रमाणे या रस्त्याच्या सर्व्हेचे काम सुरू करण्यात आले आहे.या मार्गावर अडीच किलोमीटर क्षेत्रात वन आहे. याबाबत लवकरात लवकर प्रस्ताव तयार करून तो केंद्र सरकारकडे पाठविण्यात येणार आहे. तसेच पुढच्या महिन्यात पालकमंत्री दीपक केसरकरही या रस्त्याची पाहणी करणार असून, त्यानंतर याबाबत कशा पध्दतीने पुढील कार्यवाही करायची हे निश्चित होणार आहे.

टॅग्स :forest departmentवनविभागroad transportरस्ते वाहतूकsindhudurgसिंधुदुर्ग