शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : वैद्यकीय सुविधांबरोबरच उद्योग यावेत : बबन साळगावकर, राज ठाकरे यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 15:53 IST

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याची आर्थिक प्रगती व्हावी तसेच जिल्ह्यात वैद्यकीय सुविधा निर्माण व्हाव्यात यासाठी सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्यासह उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेत तसे निवेदनही त्यांना दिले.

ठळक मुद्देसिंधुदुर्ग : वैद्यकीय सुविधांबरोबरच उद्योग यावेत : बबन साळगावकर यांची अपेक्षाराज ठाकरे यांना दिले निवेदन

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याची आर्थिक प्रगती व्हावी तसेच जिल्ह्यात वैद्यकीय सुविधा निर्माण व्हाव्यात यासाठी सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्यासह उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेत तसे निवेदनही त्यांना दिले.

मंगळवारपासून राज ठाकरे यांच्या कोकण दौऱ्याला सावंतवाडीतून सुरुवात झाली आहे. त्यामुळे सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी त्यांची येथील मँगो हॉटेलमध्ये भेट घेतली. यावेळी मनसे नेते नितीन सरदेसाई, माजी आमदार परशुराम उपरकर, अनिल शिदोरे, धीरज परब, वाहतूक सेना प्रमुख संजय नाईक, सिंधुदुर्ग वाहतूक सेनाप्रमुख राजू कासकर आदी उपस्थित होते.सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये औद्योगिक क्रांती आणण्यासाठी गेल्या सत्तर वर्षांमध्ये विशेष प्रयत्न झाल्याचे दिसून येत नाही. जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये औद्योगिक क्रांती घडून आली तर वेगळे चित्र दिसून येईल.  सिंधुदुर्गमधील लोकसंख्या दिवसेंदिवस घटत असल्याचे चित्र आहे.

तरुण नोकरीसाठी महानगराच्या ठिकाणी स्थलांतर करीत आहेत. हे चित्र बदलण्यासाठी जिल्ह्यात व्यापार-उद्योगांबरोबरच वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणे गरजेच्या असून, मनसेच्यावतीने प्रयत्न करावेत. काही शहरात थोड्याफार प्रमाणात निवासी संकुले उभी राहिली आहेत. शिवसेनेचे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी हा जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित केला होता.पण गेल्या पंचवीस वर्षांत मूलभूत सुविधांशिवाय पर्यटन वाढीसाठी विशेष प्रयत्न झाले नाहीत ही वस्तुस्थिती आहे. या जिल्ह्यात प्रदूषणकारी प्रकल्प नकोत ही येथील लोकांची भावना बरोबर आहे. पण इतर अनेक प्रकल्प आहेत जे या जिल्ह्यात उभे राहू शकतात. नोकऱ्यांसाठी रोजगार मेळावे, शिबिरे, मुलाखती होतात, पण नोकऱ्या नाहीत, असे या निवेदनात म्हटले आहे.साळगावकर यांनी निवेदनात पुढे म्हटले आहे की, जिल्ह्यात हजारो एकर पडीक जमीन आहे. पण या ठिकाणी औद्योगिकीकरण होऊ शकले नाही. त्यासाठी ठोस निर्णय होणे गरजेचे आहे. कोल्हापूर, सांगली, नाशिक, पुणे तसेच शेजारील गोवा राज्याची प्रगती औद्योगिकीकरणामुळे झाली आहे. तेथील राजकीय शक्ती यासाठी प्रबळ आहे. मात्र येथे होऊ घातलेल्या प्रकल्पांना विरोध होतो. यामागचे कारण काय, त्याचे समाधान कशात आहे, याची चर्चा सर्व स्तरावर होणे आवश्यक आहे.

 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गRaj Thackerayराज ठाकरे