शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : सावंतवाडीचे उपकार्यकारी अभियंता धारेवर, विजेच्या समस्यांबाबत बांदावासीयांचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 15:31 IST

बांदा शहरातील वीज वितरणच्या गलथान कारभारामुळे सावंतवाडीचे उपकार्यकारी अभियंता अमोल राजे यांना ग्रामस्थांच्या तीव्र रोषाला सामोरे जावे लागले. रात्र पाळीसाठी शहरात दोन लाईनमनची नियुक्ती करणे, वारंवार वीज गायब होणे, जीर्ण वीज खांब, जीर्ण वीजवाहिन्या, भरमसाठ वीज बीले या प्रश्नांबाबत बांदा उपसरपंच अक्रम खान यांनी अभियंता राजे यांना धारेवर धरले.

ठळक मुद्देसावंतवाडीचे उपकार्यकारी अभियंता धारेवरविजेच्या समस्यांबाबत बांदावासीयांचा निर्धार मागण्यांची पूर्तता होईपर्यंत वीज बीले भरणार नाही

सिंधुदुर्ग : बांदा शहरातील वीज वितरणच्या गलथान कारभारामुळे सावंतवाडीचे उपकार्यकारी अभियंता अमोल राजे यांना ग्रामस्थांच्या तीव्र रोषाला सामोरे जावे लागले. रात्र पाळीसाठी शहरात दोन लाईनमनची नियुक्ती करणे, वारंवार वीज गायब होणे, जीर्ण वीज खांब, जीर्ण वीजवाहिन्या, भरमसाठ वीज बीले या प्रश्नांबाबत बांदा उपसरपंच अक्रम खान यांनी अभियंता राजे यांना धारेवर धरले.

आम्हांला केवळ आश्वासने नकोत, कार्यवाही हवी आहे. जोपर्यंत मागण्यांबाबत सकारात्मक कार्यवाही होत नाही, तोपर्यंत शहरात कोणीही वीज बील भरणार नाहीत. दरम्यानच्या काळात कनेक्शन तोडण्याचा प्रयत्न झाल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील असा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी शहरातील सर्व समस्या येत्या पंधरा दिवसांत सोडविण्याचे आश्वासन राजे यांनी ग्रामस्थांना दिले.बांदा शहरातील वीज समस्यांबाबत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षामार्फत सोमवारी बांदा कार्यालयात सहाय्यक अभियंता सुभाष आपटेकर यांना घेराओ घालण्यात आला होता. त्यावेळी फोनवरून सावंतवाडी उपकार्यकारी अभियंता अमोल राजे यांनी मंगळवारी बांद्यात येण्याचे मान्य केले होते. त्यानुसार मंगळवारी सकाळी ते बांदा कार्यालयात हजर झाले.

यावेळी अक्रम खान, ग्रामपंचायत सदस्य जावेद खतीब, स्वाभिमानचे विभागीय अध्यक्ष ज्ञानेश्वर सावंत, बाबू पटेकर, गजानन गायतोंडे, साई धारगळकर, संदीप सावंत, सुभाष मोर्ये यांनी अभियंता राजे यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली.

बांदा शहरात रात्रीच्या वेळी कोणतीही समस्या उद्भवल्यास कर्मचारी उपलब्ध नसतात. त्यामुळे रात्रपाळीसाठी कायमस्वरूपी दोन कर्मचारी नियुक्त करण्याची मागणी करण्यात आली. शहरातील बहुतांशी वीज खांब जीर्ण झाले आहेत. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गmahavitaranमहावितरण