शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : कणकवलीत पोलिसांचे संचलन, नगरपंचायत निवडणुकीच्या बंदोबस्ताची रंगीत तालीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 16:10 IST

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महत्वाच्या कणकवली नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक शशिकांत खोत यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातून पोलिसांनी संचलन केले. निवडणूक ६ एप्रिलला होणार आहे.

ठळक मुद्देकणकवलीत पोलिसांचे संचलननगरपंचायत निवडणुकीच्या बंदोबस्ताची रंगीत तालीम

सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील महत्वाच्या कणकवली नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक शशिकांत खोत यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातून पोलिसांनी संचलन केले. निवडणूक ६ एप्रिलला होणार आहे.

कणकवली नगरपंचायत निवडणूक भाजप, शिवसेना, महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष व कणकवली शहर विकास आघाडी यांनी प्रतिष्ठेची केल्यामुळे या निवडणुकीत रंगत निर्माण झाली आहे. पक्षांतर्गत नाराजी, इच्छुकांची भाऊगर्दी, तिकीटवाटपातून निर्माण झालेले मतभेद यामधून या निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे.या निवडणुकीत गडबड-गोंधळ निर्माण होऊ नये यासाठी पोलीस निरीक्षक शशिकांत खोत यांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे. या निवडणुकीसाठी जादा पोलिसांची कुमक मागविण्यात आली आहे. सध्या होमगार्डनाही बंदोबस्तासाठी बोलविण्यात आले आहे.सध्या रात्रीची गस्तही वाढविण्यात आली आहे.

गुन्हेगारीला आळा बसावा यासाठी कणकवली पोलिसांकडून सोमवारी रात्री १0 ते पहाटे ५ पर्यंत आॅल आऊट आॅपरेशनही पार पडले. या आॅपरेशनमध्ये १८ गुन्हेगार पोलिसांना सापडले. रात्री मोकळ्या मैदानांचीही पोलिसांनी तपासणी केली. मोकळ्या मैदानांवर रात्रीच्या वेळी पार्ट्या करण्यासाठी गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यामुळे मैदानांची पोलिसांनी तपासणी केली.

नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस निरीक्षक शशिकांत खोत यांनी कंबर कसली आहे. सध्या रात्रीच्या पोलीस गस्तीमध्येही वाढ करण्यात आली आहे.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पोलिसांच्या रजाही रद्द करण्यात आल्या आहेत. शहरातील बेकायदा दारूधंद्यांवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी धडक मोहीम सुरू केली आहे. निवडणूक शांततेत पार पडावी यासाठी पोलीस निरीक्षक खोत यांचे प्रयत्न सुरू आहेत. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गpolice parade groundपोलिस कवायत मैदान