शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : वैभववाडीतील धान्य दुकानांवरील स्थिती : पुरवठा विभागाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 16:21 IST

रास्त धान्य दुकानांवर पुरविण्यात आलेल्या सदोष ई-पॉस मशीन आणि इंटरनेट कनेक्टिव्हीटीच्या समस्येने तालुक्यातील धान्य दुकानदारांना ग्रासले आहे. त्याचा फटका लाभार्थींना बसत असून बायोमेट्रिकच्या सक्तीमुळे जनतेला नाहक शारीरिक आणि मानसिक त्रास सोसावा लागत आहे.

ठळक मुद्देवैभववाडीतील धान्य दुकानांवरील स्थिती पुरवठा विभागाचे दुर्लक्ष; दुकानदार होताहेत टार्गेटबायोमेट्रिकमुळे लाभार्थी वेठीस

वैभववाडी : रास्त धान्य दुकानांवर पुरविण्यात आलेल्या सदोष ई-पॉस मशीन आणि इंटरनेट कनेक्टिव्हीटीच्या समस्येने तालुक्यातील धान्य दुकानदारांना ग्रासले आहे. त्याचा फटका लाभार्थींना बसत असून बायोमेट्रिकच्या सक्तीमुळे जनतेला नाहक शारीरिक आणि मानसिक त्रास सोसावा लागत आहे. मात्र, पुरवठा विभागाकडून या प्रकाराची दखल घेतली जात नसल्याने धान्य दुकानदार आणि जनतेत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.राज्य सरकारने धान्य वितरण व्यवस्थेतील गैरव्यवहार रोखण्यासाठी बायोमेट्रिक प्रणाली अंमलात आणून धान्य दुकानांवर त्याची सक्ती केली. त्याला संभाव्य अडचणी लक्षात घेऊन धान्य दुकानदारांनी विरोध केला. मात्र धान्य दुकानदारांचा विरोध मोडीत काढून धान्य वितरणासाठी ई-पॉस मशीन पुरविण्यात आल्या. परंतु, धान्य दुकानांवरील समस्या आणि जनतेच्या गैरसोयीकडे प्रशासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे.तालुक्यातील ३४ गावांमध्ये रास्त धान्य दुकाने मंजूर असून त्यापैकी सध्या ३१ दुकाने कार्यान्वित आहेत. तर तीन गावे लगतच्या धान्य दुकानांवर जोडण्यात आली आहेत. तालुक्यातील सर्व धान्य दुकानांवर ई-पॉस मशीनद्वारे ठसे घेऊन बायोमेट्रिक पद्धतीनेच धान्य वितरणाची सक्ती करण्यात आले असून इंटरनेट कनेक्टिव्हीटी उपलब्ध नसलेल्या गावांमध्ये आॅफलाईन धान्य वितरणाची मुभा देण्यात आली आहे. परंतु, इंटरनेट कनेक्टिव्हीटी असलेल्या गावातील जनतेचे प्रचंड हाल होत आहेत.

बऱ्याच ई-पॉस मशीन सदोष असल्याने त्यामध्ये सातत्याने तांत्रिक बिघाड निर्माण होत आहे. तसेच काही ठिकाणी इंटरनेट सुविधा उपलब्ध असूनही कनेक्टिव्हीटी मिळत नसल्याने ई-पॉस मशीन एरर दाखवितात. त्यामुळे लाभार्थींना धान्यासाठी दिवस दिवस दुकानावर घालवूनही रिकाम्या हाताने परतावे लागत आहे.

त्यामुळे धान्य दुकानदारांवर ग्राहक रोष व्यक्त करु लागले आहेत. याबाबत धान्य दुकानदारांनी पुरवठा विभागाला कल्पना देऊनही त्याची दखल घेतली गेलेली नाही. त्यामुळे वैभववाडी तालुक्यातील धान्य दुकानदारांची अवस्था मृदुंगासारखी झाली आहे.आपत्कालीन स्थितीत आॅफलाईनची मुभा द्यावीतालुक्यात ३४ रास्त धान्य दुकाने मंजूर असून त्यापैकी मांगवलीला वेंगसर, अरुळेला निराळे आणि सांगुळवाडीला नावळे गाव जोडण्यात आले आहे. बायोमेट्रिक पद्धतीने धान्य वितरण करताना ई-पॉस मशीनद्वारे ठसे घेतल्याशिवाय धान्य वितरण न करण्याचे पुरवठा विभागाचे सक्त आदेश आहेत.

त्यामुळे दोन गावातील लाभार्थीना बायोमेट्रिक पद्धतीने धान्य वितरणात इंटरनेट कनेक्टिव्हीटीची समस्या अडचणीत टाकत आहे. त्यामुळेच लाभार्थींना दिवस दिवस ताटकळत बसावे लागत असल्याने इंटरनेट कनेक्टिव्हीटी नसताना आणि 'ई-पॉस' मशीनमध्ये तांत्रिक बिघाड उद््भवल्यास आॅफलाईन पध्दतीने धान्य वितरणाची मुभा मिळावी, अशी मागणी धान्य दुकानदार व लाभार्थींकडून केली जात आहे. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गcollectorतहसीलदार