शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : ओरोस येथे मोदी सरकार चले जावचा नारा, महामार्ग ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 14:05 IST

ओरोस श्री देव रवळनाथ मंदिरसमोर महामार्ग अडवून रास्ता रोको आंदोलन केले. तसेच सरकारच्या कामगारविरोधी धोरणाचा निषेध केला. यावेळी तब्बल १५ मिनिटे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.

ठळक मुद्देओरोस येथे मोदी सरकार चले जावचा नारा, महामार्ग ठप्प सेंटर आॅफ इंडियन ट्रेड युनियनने ओरोस फाटा येथे केले रास्ता रोको आंदोलन

सिंधुदुर्गनगरी : चले जाव, चले जाव, मोदी सरकार चले जाव.., कामगारांवर अन्याय करणाऱ्या मोदी सरकारचा धिक्कार असो..!, कामगार एकजुटीचा विजय असो...!, मानधन नको, वेतन हवे अशा विविध गगनभेदी घोषणा देत सेंटर आॅफ इंडियन ट्रेड युनियन (सीटू) संलग्न असणाऱ्या आशा वर्कर्स, गटप्रवर्तक, पोषण आहार कामगार, वैद्यकीय प्रतिनिधी यांनी दोन दिवसांच्या संपावर जात ओरोस श्री देव रवळनाथ मंदिरसमोर महामार्ग अडवून रास्ता रोको आंदोलन केले. तसेच सरकारच्या कामगारविरोधी धोरणाचा निषेध केला. यावेळी तब्बल १५ मिनिटे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.

रास्ता रोकोमुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. (छाया : विनोद परब)शेकडोंना अटक व सुटका!आशा वर्कर्स, गटप्रवर्तक, शालेय पोषण आहार कर्मचारी तसेच वैद्यकीय प्रतिनिधी यांनी आपल्या मागण्यांसाठी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. महामार्गावर रास्ता रोको करीत वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी संबंधित शेकडो कर्मचाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणले व समज देत त्यांची सुटका करण्यात आली.या आहेत प्रमुख मागण्या...जीवनावश्यक वस्तूंच्या सट्टाबाजारावर बंदी घाला, महागाई नियंत्रणात आणा, किमान वेतनाची हमी द्या, कामगार कायद्याची कडक अंमलबजावणी करा, सर्व कामगारांना सार्वत्रिक सामाजिक सुरक्षा लागू करा, शेतकरी शेतमजूर यांना पेन्शन लागू करा, कंत्राटीकरण बंद करा यासह एकूण १२ मागण्यांकडे लक्ष वेधण्यात आले. 

टॅग्स :Morchaमोर्चाsindhudurgसिंधुदुर्ग