शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : आगामी निवडणुकीत ताकद दाखवा : वैभव नाईक यांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 13:39 IST

युवासेनेत चांगले काम केलात तर भविष्यात शिवसेनेमध्येही तुम्हांला चांगले भवितव्य आहे. यासाठी प्रथमत: युवासेनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त नवीन मतदारांची नावनोंदणी करा, असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक यांनी केले.

ठळक मुद्देआगामी निवडणुकीत ताकद दाखवा : वैभव नाईक यांचे आवाहनयुवासेना रिक्त व नूतन पदाधिकारी निवडीसाठीच्या मुलाखतींचा कार्यक्रम

सिंधुदुर्ग : आज प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा सुरू आहे. तशीच ती राजकारणातही आहे. यासाठी आपण सक्षम असले पाहिजे. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत युवासेनेची ताकद दिसून आली आहे. तसेच काम आगामी निवडणुकांमध्ये होणे गरजेचे आहे. युवासेनेत चांगले काम केलात तर भविष्यात शिवसेनेमध्येही तुम्हांला चांगले भवितव्य आहे. यासाठी प्रथमत: युवासेनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त नवीन मतदारांची नावनोंदणी करा, असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक यांनी केले.कणकवली विजय भवन येथे सिंधुदुर्ग जिल्हा युवासेना कार्यकारिणीमध्ये रिक्त असलेल्या व नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यासाठी इच्छुक युवा सैनिकांच्या मुलाखती जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर व युवासेना मुंबई कोअर कमिटीच्या उपस्थितीत घेण्यात आल्या. यावेळी मार्गदर्शन करताना वैभव नाईक बोलत होते.ते पुढे म्हणाले, नवीन मतदारांची नावनोंदणी झाल्यास कणकवली मतदार संघातही मोठ्या मताधिक्याने शिवसेनेला विजय संपादन करता येईल. त्यासाठी प्रत्येक युवासैनिकाने किमान १० नवीन मतदारांची नावनोंदणी करावी. कुडाळ-मालवण मतदारसंघात विद्यार्थी वर्गासाठी स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे कणकवलीतही विद्यार्थीप्रमुख नेमून विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रम घ्यावेत. त्यासाठी लागणारे सहकार्य आम्ही करू, असे आमदार नाईक यांनी सांगितले.यावेळी युवासेना सहसचिव (मुंबई) देवेंद्र कांबळी, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. हर्षद गावडे, कणकवली तालुकाप्रमुख राजू राठोड, वैभववाडी तालुकाप्रमुख स्वप्नील धुरी, कणकवली सरचिटणीस अनुप वारंग, वैभववाडी सरचिटणीस अतुल सरवटे, शहरप्रमुख तेजस राणे, उपतालुकाप्रमुख सचिन पवार, ललित घाडीगांवकर, प्रकाश मेस्त्री, रोहित राणे, सिद्धेश राणे, वैभव सावंत आदी युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.संघटना बळकट करा : अरुण दुधवडकरयावेळी अरुण दुधवडकर म्हणाले, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे महाराष्ट्र दौरा करीत आहेत . त्यामुळे युवासेनेत उत्साह आहे. हा उत्साह कायम ठेवून युवासेना संघटना बळकट करणे गरजेचे आहे.

यासाठी सर्वांनी जोमाने काम करावे. उद्धव ठाकरे यांनी ह्यएकला चलो रेह्णचा दिलेला नारा यासाठी जिद्दीने अपेक्षित असलेले काम आपण करायचे आहे. येत्या निवडणुकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीनही आमदार व खासदार निवडून आणून आपल्याला पक्षप्रमुखांना अनोखी भेट द्यायची आहे, असेही ते म्हणाले. 

टॅग्स :Vaibhav Naikवैभव नाईक sindhudurgसिंधुदुर्ग