शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : मराठा समाजाचे मार्गदर्शक व्ही. डब्ल्यू. सावंत यांचे निधन, कणकवलीत अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 15:02 IST

सिंधुदुर्ग जिल्हा मराठा क्रांती मोर्चातील अग्रणी, मराठा समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक व सेवानिवृत्त एसटी अधिकारी वसंत वामन उर्फ व्ही. डब्ल्यू. सावंत यांचे गुरूवारी दुपारी पुणे येथे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने सिंधुदुर्गातील मराठा समाजाची मोठी हानी झाली आहे अशा शब्दांत अनेक मराठा बांधवांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

ठळक मुद्दे मराठा समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक व्ही. डब्ल्यू. सावंत यांचे निधनकणकवलीत झाले अंत्यसंस्कार

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा मराठा क्रांती मोर्चातील अग्रणी, मराठा समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक व सेवानिवृत्त एसटी अधिकारी वसंत वामन उर्फ व्ही. डब्ल्यू. सावंत यांचे गुरूवारी दुपारी पुणे येथे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने सिंधुदुर्गातील मराठा समाजाची मोठी हानी झाली आहे अशा शब्दांत अनेक मराठा बांधवांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.दरम्यान , शुक्रवारी सकाळी 9.30 वाजता कणकवली येथील मराठा मंडळ जवळील स्मशानभूमित त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.भिरवंडे गावचे सुपूत्र असलेले व्ही. डब्ल्यू. सावंत हे एसटीच्या सिंधुदुर्ग विभागातून विभागीय कर्मचारी वर्ग अधिकारी म्हणून काही वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाले होते. एसटी महामंडळामध्ये लिपिक, वरिष्ठ लिपिक, लेखापाल, पर्यवेक्षक व अधिकारी अशा विविध पदांवर ते कार्यरत होते.

एसटी कामगार संघटनेमध्ये ते राज्य उपाध्यक्ष पदावर कार्यरत होते. एसटी कामगार संघटनेचे संस्थापक भाऊ फाटक, कामगार नेते जॉर्ज फर्नांडिस यांच्या सोबत व्ही. डब्ल्यू. सावंत यांनी काम केले होते. एसटी कामगार संघटना सिंधदुर्गचे ते संस्थापक होते. एसटी महामंडळातून सेवानिवृत्त झाल्यानंतर कामगार संघटनेमध्ये मार्गदर्शक म्हणून ते कार्यरत होते.माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत, स्वर्गीय श्रीधर नाईक यांचे ते निकटवर्तीय म्हणून ओळखले जात. एसटी महामंडळातून निवृत्त झाल्यानंतर सामाजिक कार्यात ते नेहमीच अग्रेसर असत .मराठा मुक मोर्चा कणकवली तालुका समन्वयक पदाची जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पार पाडली होती. त्यांच्या नेतृत्वाखालील मराठा समाजाने शिवजयंती उत्सवाचे यशस्वी आयोजनही केले होते. सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान ओरोस तसेच एसटी को. ऑप. बँकेचे संचालक म्हणूनही त्यांनी काम केले आहे.कणकवली व परिसरात एखादा अपघात झाला किंवा दुःखद घटना घडली तर मदतीसाठी ते नेहमीच पुढे असत.गेले काही महिने ते आजारी होते. त्यांच्यावर कणकवली तसेच पुणे येथील खाजगी रूग्णालयात उपचार करण्यात आले होते. आजारपणातच त्यांचे गुरूवारी दुपारी पुणे येथे निधन झाले.गुरुवारी रात्री उशिरा त्यांचा मृतदेह कणकवली मधलीवाडी येथील निवासस्थानी आणण्यात आला. शुक्रवारी सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास त्यांच्यावर कणकवलीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, भाऊ, तीन बहिणी असा परिवार आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग