शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : पुणे येथे होणार दुसरे अखिल भारतीय चित्र शिल्प कला संमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 17:44 IST

अखंड लोकमंच सिंधुदुर्ग आणि महाराष्ट्र कल्चरल सेंटर, सुदर्शन रंगमंच यांच्या सहयोगाने पुणे येथे ९,१० आणि ११ फेब्रुवारीला दुसरे अखिल भारतीय चित्र शिल्प कला संमेलन होणार आहे. या संमेलनात देशभरातील नामवंत चित्रकार आणि शिल्पकार सहभागी होत आहेत.

ठळक मुद्देसिंधुदुर्गात होणार चित्र प्रदर्शन, अखंड लोकमंचचे आयोजन देशभरातील मान्यवर कलावंतांशी कलासंवादपुणे येथे सुमारे १३०  कलाकारांच्या ३०० चित्रांचे प्रदर्शन

कणकवली : अखंड लोकमंच सिंधुदुर्ग आणि महाराष्ट्र कल्चरल सेंटर, सुदर्शन रंगमंच यांच्या सहयोगाने पुणे येथे ९,१० आणि ११ फेब्रुवारीला दुसरे अखिल भारतीय चित्र शिल्प कला संमेलन होणार आहे. या संमेलनात देशभरातील नामवंत चित्रकार आणि शिल्पकार सहभागी होत आहेत. तसेच विविध विषयांवर कलासंवाद, चित्रप्रदर्शन, चित्रपट, शास्त्रीय संगीत मैफल आदी कार्यक्रम होणार आहेत.अशी माहिती अखंड लोकमंच सिंधुदुर्ग संस्थेचे अध्यक्ष नामानंद मोडक यांनी येथे दिली.कणकवली येथील स्वामी आर्ट स्टूडियोत मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी नामानंद मोडक म्हणाले, अखंड लोकमंच सिंधुदुर्ग संस्थेच्यावतीने अखिल भारतीय स्तरावरील पहिले चित्र शिल्प कला संमेलन गतवर्षी कणकवलीत झाले होते. यानंतर दुसरे संमेलन पुणे येथील सुदर्शन रंगमंच, अहिल्यादेवी शाळेजवळ, शनिवार पेठ पुणे येथे होत आहे.

या कला संमेलनाचे उद्घाटन ९ फेबु्रवारीला सकाळी १० वाजता माधुरी पुरंदरे यांच्याहस्ते होईल. तर प्रमुख पाहुणे ज्येष्ठ विचारवंत किरण नगरकर, गझल नवाझ भीमराव पांचाळे आणि डॉ. जयंत पंडित असणार आहेत. उद्घाटन कार्यक्रमानंतर दुपारी १.३० ते ३ या वेळेत राजू सुतार (पुणे) आणि श्रीकांत कदम (पुणे) हे कलासंवाद साधणार आहेत.

दुपारी ३.३० ते ४.३० या वेळेत राम पंडित आणि गौरी पंडित यांचे गायन होणार आहे. दुपारी ४.३०  ते ५ .३० या वेळेत मानस गोसावी यांचे मोहनवीणा वादन तर मृगेंद्र मोहाडकर यांचे बासरीवादन होईल. दुसर्‍या सत्रात सायंकाळी ६ ते ८ या वेळेत बडोदा येथील दीपक कन्नल हे कलारसिकांशी कलासंवाद साधार आहेत. तर रात्री १० नंतर चित्रपट सादर होणार आहे.१० फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत पहिले सत्र होईल. यात पुणे येथील संदीप देशपांडे, अर्चना पेंडसे आणि अमर पाटील हे कलासंवाद साधणार आहेत. तर दुपारी ४ ते ५ या वेळेत भाग्यश्री पांचाळे आणि सुनील बोरगावकर यांचे शास्त्रीय गायन होणार आहे. दुसर्‍या सत्रात सायंकाळी ६ ते ८ या वेळेत पुणे येथील समर नखाते हे कलासंवाद मध्ये सहभागी होणार आहेत. तर रात्री १० नंतर चित्रपट होणार आहे.रविवारी चित्र शिल्प आणि कला संमेलनाचा समारोप होणार आहे. यात पहिल्या सत्रात सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत पुणे येथील सतीश काळे आणि अभिजित रणदिवे हे कलारसिकांशी कलासंवाद साधणार आहेत. तर दुपारच्या सत्रात सायंकाळी ४ ते ५ या वेळेत मानसकुमार यांचे व्हायोलिन वादन होईल. त्यांना मनीष मदनकर हे तबलासाथसंगत करणार आहेत. दुसर्‍या सत्रात सायंकाळी ६ ते रात्री ९ या वेळेत ज्येष्ठ आणि नामवंत चित्रकार प्रभाकर कोलते हे कलारसिकांशी कला संवाद साधणार आहेत.या संमेलनाच्या तिन्ही दिवशी चित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात एफ. एन. सुझा, एन. एस. बेंद्रे, तय्यब मेहता, किशन खन्ना, के. एच. आरा, राम कुमार, एस. एच. रझा, सदानंद बाकरे, के. के. हेब्बर, या आंतरराष्ट्रीय कीर्ती लाभलेल्या कलाकारांच्या चित्रांचं प्रदर्शन बघण्याचा योग कलारसिकांना लाभणार आहे.

त्याचबरोबर नव्या पिढीतील कलाकार जॉन तुन्सेन, राजू सुतार, प्रकाश वाघमारे, सतीश काळे, अमर पाटील, हेमंत ढाणे, श्रीकांत कदम, नितीन हडप, संदीप सोनवणे, वैशाली ओक आणि सई देशपांडे यांच्याही चित्राचे प्रदर्शन सोबत असणार आहे.कणकवलीनंतर पुणे येथे होत असलेल्या या चित्र शिल्प कला संमेलनाला सिंधुदुर्गातील कलावंत आणि रसिकांनी सहभागी व्हावे असे आवाहनही नामानंद मोडक यांनी यावेळी केले.सिंधुदुर्गात होणार चित्र प्रदर्शन !पुणे येथील चित्र शिल्प कला संमेलनाच्या ठिकाणी सुमारे १३०  कलाकारांच्या ३०० चित्रांचे प्रदर्शन लावण्यात येणार आहे. या संमेलनानंतर या चित्रांचे प्रदर्शन सिंधुदुर्ग जिल्ह्यात लावण्यात येणार असल्याची माहिती यावेळी नामानंद मोडक यांनी दिली.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गcultureसांस्कृतिक