शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : समुद्रकिनारी बेवारस सिलिंडर आढळला, बॉम्बशोधक पथकाकडून निकामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 16:50 IST

देवगड तालुक्यातील तांबळडेग समुद्रकिनारी एका मच्छिमाराला बेवारस स्थितीत सिलिंडर आढळल्याने खळबळ उडाली. मात्र, चौकशीअंती मिळालेला रिकाम्या स्थितीतील सिलिंडर नौकेवर कुलींगसाठी वापरण्यात आल्याचे निष्पन्न झाल्याने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. बॉम्बशोधक-नाशक पथकाने हा सिलिंडर निकामी केला.

ठळक मुद्देसमुद्रकिनारी बेवारस सिलिंडर आढळला, तांबळडेग येथील घटना बॉम्बशोधक पथकाकडून निकामी

सिंधुदुर्ग : देवगड तालुक्यातील तांबळडेग समुद्रकिनारी एका मच्छिमाराला बेवारस स्थितीत सिलिंडर आढळल्याने खळबळ उडाली. मात्र, चौकशीअंती मिळालेला रिकाम्या स्थितीतील सिलिंडर नौकेवर कुलींगसाठी वापरण्यात आल्याचे निष्पन्न झाल्याने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. बॉम्बशोधक-नाशक पथकाने हा सिलिंडर निकामी केला.देवगड तालुक्यातील तांबळडेग समुद्रकिनारी संतोष राघोबा कोयंडे या मच्छिमाराला रविवारी सायंकाळी ५.३० वाजण्याचा सुमारास बेवारस स्थितीत सिलिंडर आढळला. त्यांनी याबाबत देवगड पोलीस स्टेशनला कळविल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक जी. व्ही. वारंग, सागर पोलीस दलाचे पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र साळुंखे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दशरथ चव्हाण, मधुकर पानसरे, शैलेश कांबळे, दादा परब आदींनी घटनास्थळी जाऊन सिलिंडर ताब्यात घेतला.

तो निकामी करण्यासाठी सिंधुदुर्ग बॉम्बशोधक-नाशक पथकाला पाचारण करण्यात आले. मंगळवारी सायंकाळी या पथकाने देवगड येथे निर्जनस्थळी हा सिलिंडर निकामी केला. या पथकामध्ये एस. पी. साटम, व्ही. व्ही. वरवडेकर, एल. आर. तवटे, एस. एन. शिंदे, एम. ए. घाडीगावकर, पी. पी. दळवी, श्वान लकी आदी सहभागी होते.तांबळडेग येथे मिळालेला सिलिंडर हा तपासाअंती बोटींवर कुलींगसाठी वापरण्यात येणारा सिलिंडर असल्याचे निष्पन्न झाले असून बोटीवर एकदा वापरून झाल्यानंतर तो समुद्रातील पाण्यात फेकल्याने गंजला होता.मे महिन्यात मळई खाडीकिनारीही अशाच पध्दतीचा सिलिंडर सापडला होता.

सर्वसाधारण पावसाळा सुरू होण्यापूर्वी व पावसाळ्यात समुद्रात अशाप्रकारच्या बेवारस वस्तू आढळत असून मच्छिमारांनीही अशा वस्तू आढळल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गPoliceपोलिस