शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

सिंधुदुर्ग : पंचायत समितीत पालकांनी भरवली शाळा, शिक्षकासाठी मालोंड ग्रामस्थ आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 16:19 IST

वारंवार मागणी करूनही शाळेतील रिक्त शिक्षकांची पदे न भरणा केल्याने संतप्त बनलेल्या मालोंड शाळा नंबर एक मधील सर्व मुलांना पालकांनी पंचायत समितीत बसवत अनोखे आंदोलन छेडले. शाळेतील सर्व मुले शाळा बंद करून पंचायत समितीत आणण्याच्या या प्रकाराने शिक्षण विभागात खळबळ उडाली.

ठळक मुद्देपंचायत समितीत पालकांनी भरवली शाळा शिक्षकांच्या मागणीसाठी मालोंड ग्रामस्थ-पालक आक्रमक  शिक्षक नेमणुकीनंतर आंदोलन मागे

मालवण : वारंवार मागणी करूनही शाळेतील रिक्त शिक्षकांची पदे न भरणा केल्याने संतप्त बनलेल्या मालोंड शाळा नंबर एक मधील सर्व मुलांना पालकांनी पंचायत समितीत बसवत अनोखे आंदोलन छेडले. शाळेतील सर्व मुले शाळा बंद करून पंचायत समितीत आणण्याच्या या प्रकाराने शिक्षण विभागात खळबळ उडाली.दरम्यान,  गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर यांनी पालक व गटशिक्षणाधिकारी दत्तात्रय मुळीक यांची बैठक बोलवत समस्या जाणून घेतल्या. अखेर शाळेवर या संपूर्ण वर्षासाठी शिक्षक नेमणूक देण्यात आली. शिक्षकही तातडीने शाळेवर रवाना झाल्याने पालकांनी छेडलेले आंदोलन मागे घेतले.यावेळी सरपंच वैशाली घाडीगांवकर, पोलीस पाटील पांडुरंग तांडेल, सुहास सुर्वे, मकरंद तांडेल, रवींद्र तांडेल, महेश परब, औदुंबर तांडेल, नवनाथ घाडीगांवकर, पुर्वा फणसगावकर, जयवंत पारकर, पद्माकर फणसगावकर, गौरी परब, प्रणाली परब, सुलतान शेख, सुवर्णा मालंडकर आदी व इतर ग्रामस्थ तसेच विद्यार्थी उपस्थित होते. स्वाभिमान जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, उपसभापती अशोक बागवे, शिवसेना तालुकाप्रमुख बबन शिंदे यांनीही पालकांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शविला.मालोंड एक नंबर शाळेत सातवी इयत्तेपर्यंत वर्ग असून सध्या २५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. निकषाचा विचार करता सहावी ते आठवी या वर्गासाठी पदवीधर शिक्षक अपेक्षित आहेत. मात्र तालुक्यात ११२ शिक्षक पदे रिक्त असल्याने शाळेत शिक्षक संख्या कमी आहे. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत होत आहे.मालोंड शाळेत एकही पदवीधर शिक्षक नसल्याने पालक आक्रमक बनले. अखेर विस्तार अधिकारी यांच्या अधिकारात शाळेवर शिक्षक नेमणूक देण्यात आल्याने पालकांनी आंदोलन स्थगित केले.वैभव नाईक यांनी सचिवांची घेतली भेटसिंधुदुर्ग जिल्ह्यात चार हजार साठ शिक्षक पदे मंजूर आहेत. मात्र सध्या तीन हजार चारशे सहासष्ठ शिक्षक कार्यरत आहेत. सहाशे शिक्षक पदे रिक्त आहेत. त्यात २३५ शिक्षकांच्या जिल्ह्याबाहेर बदली झाल्या. त्यातील ६५ शिक्षकांना सोडण्यात आले. तर केवळ ६ शिक्षक जिल्ह्याबाहेरून आले.

शेकडो शिक्षक पदे रिक्त असल्याने शिक्षणावर याचा परिमाण होतो. तरी बदली झालेल्या शिक्षकांना सोडण्यात येऊ नये अशी मागणी आमदार वैभव नाईक यांनी मंत्रालयात शासन सचिवांकडे केली आहे. शासन सचिवांनीही याबाबत सकारात्मक भूमिका घेतली. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गSchoolशाळा