शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुुदुर्ग : अंध, अपंगांच्या आक्रोशला प्रतिसाद, सावंतवाडी प्रांताधिकारी कार्यालयावर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 14:50 IST

अनाथ, निराधार, अंध-अपंग व दारिद्र्यरेषेखाली असहाय्य जीवन जगणाऱ्या घटकांना शासन पातळीवर न्याय मिळावा या मागणीसाठी जिल्ह्यातील अपंग बांधवांचा आक्रोश मोर्चा माजी नगरसेवक सुनील पेडणेकर व प्रहार अपंग क्रांतीच्या जिल्हाध्यक्षा श्रद्धा आंबेकर यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी येथील प्रांत कार्यालयावर धडकला.

ठळक मुद्देअंध, अपंगांच्या आक्रोशला प्रतिसादसावंतवाडी प्रांताधिकारी कार्यालयावर धडक  विविध मागण्यांचे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन सादर

सिंधुुदुर्ग : अनाथ, निराधार, अंध-अपंग व दारिद्र्यरेषेखाली असहाय्य जीवन जगणाऱ्या घटकांना शासन पातळीवर न्याय मिळावा या मागणीसाठी जिल्ह्यातील अपंग बांधवांचा आक्रोश मोर्चा माजी नगरसेवक सुनील पेडणेकर व प्रहार अपंग क्रांतीच्या जिल्हाध्यक्षा श्रद्धा आंबेकर यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी येथील प्रांत कार्यालयावर धडकला.यावेळी महालक्ष्मी अंध-अपंग सामाजिक संघटनेच्या शिष्टमंडळाने आपल्या मागण्यांचे निवेदन प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांना सादर केले. दरम्यान, अपंगांनी केलेल्या मागण्यांबाबत लवकरच वरिष्ठांचे लक्ष वेधणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.महाराष्ट्र शासनाच्या बदलत्या धोरणामुळे अनाथ, अपंग, निराधार व दारिद्र्यरेषेखाली जीवन जगणाऱ्या घटकांना जीवन जगणे मुश्किल झाले असून त्यांच्या प्रश्नांकडे कोणीच लक्ष देणारा नसल्याने शहरातील माजी नगरसेवक सुनील पेडणेकर यांनी महालक्ष्मी अंध-अपंग संघटनेच्यावतीने आक्रोश मोर्चाचे आयोजन केले होते.

तत्पूर्वी या मोर्चेकरांना शहरातील आदिनारायण मंगल कार्यालयात आमदार बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या प्रहार अपंग क्रांतीच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षा श्रद्धा आंबेकर व पेडणेकर यांनी मार्गदर्शन केले. या मोर्चात मोठ्या संख्येने अंध-अपंग निराधार बांधव सहभागी झाले होते.यावेळी पोलिसांनी मोर्चेकरांना थांबवित पाच ते सहा जणांच्या शिष्टमंडळाला प्रांताधिकाऱ्यांच्या भेटीसाठी पाठविण्यात आले. प्रांताधिकारी खांडेकर यांनी अपंगांच्या मागण्या शासन स्तरावरच्या असल्याने आपण वरिष्ठांपर्यंत त्या पोहोचविण्याचे काम करतो, असे सांगितले.

याशिवाय पालिकेने केलेल्या अपंगांच्या स्टॉलवर केलेल्या कारवाईबाबत आपण मुख्याधिकाऱ्यांशी बोलून तोडगा काढण्याबाबत सूचना देतो, असे सांगितले. यावेळी तहसीलदार सतीश कदम, पोलीस निरीक्षक सुनील धनावडे उपस्थित होते.

 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गcollectorतहसीलदार