शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : रिफायनरी प्रकल्पाविरोधी आझाद मैदानावर १४, १५ मार्च रोजी धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 11:02 IST

मुंबईच्या आझाद मैदानावर रिफायनरी प्रकल्पाविरोधी पुन्हा एल्गार करण्यात येणार आहे. १४ व १५ मार्च रोजी धरणे आंदोलनातून प्रकल्पाविरोधी तीव्र भावना कोकण विनाशकारी प्रकल्प विरोधी समितीच्यावतीने शासन दरबारी मांडण्यात येणार असल्याची माहिती स्थानिक प्रकल्पविरोधी समितीचे अध्यक्ष सुरेश केळकर यांनी दिली आहे.

ठळक मुद्देरिफायनरी प्रकल्पाविरोधी आझाद मैदानावर १४, १५ मार्च रोजी धरणे प्रकल्पाविरोधी पुन्हा एल्गार : सुरेश केळकर

देवगड : मुंबईच्या आझाद मैदानावर रिफायनरी प्रकल्पाविरोधी पुन्हा एल्गार करण्यात येणार आहे. १४ व १५ मार्च रोजी धरणे आंदोलनातून प्रकल्पाविरोधी तीव्र भावना कोकण विनाशकारी प्रकल्प विरोधी समितीच्यावतीने शासन दरबारी मांडण्यात येणार असल्याची माहिती स्थानिक प्रकल्पविरोधी समितीचे अध्यक्ष सुरेश केळकर यांनी दिली आहे.रामेश्वर ग्रामपंचायतीच्या परिसरामध्ये रविवारी सायंकाळी उशिरा घेण्यात आलेल्या विशेष सभेत प्रकल्पबाधित जमीन मालकांनी पुन्हा धरणे आंदोलनातून प्रकल्पविरोधी एकजूट शासनाला दाखविण्याचा निर्धार केला.

विनाशकारी रिफायनरी प्रकल्प जोपर्यंत रद्द केला जात नाही, तोपर्यंत संघर्ष कायम राहिल. रिफायनरी प्रकल्पबाधित भूमिपुत्रांची भूमिका मुख्यमंत्र्यांना दाखविण्यासाठी पुन्हा एकदा एल्गार करण्यात येणार असून गिर्ये-रामेश्वरसह राजापूर-नाणार परिसरातील जमीन मालक या आंदोलनात सहभागी होणार असल्याचे सुरेश केळकर यांनी सांगितले आहे.

यावेळी सरपंच विनोद सुके, जिल्हा परिषद सदस्या वर्षा पवार, महमंदअली मुकादम, मिलेश बांदकर, मधुकर गिरकर, भरत घारकर, रमेश अणुसरकर तसेच सुमारे २५० हून अधिक ग्रामस्थ जमीन मालक व महिला आदी उपस्थित होते.विरोध असेल तर प्रकल्प लादणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणत असतील तर यापूर्वी प्रकल्पाविरोधी मुंबईच्या आझार मैदानावर केलेल्या आंदोलनाची दखल का घेतली जात नाही? प्रकल्प क्षेत्रातील स्थानिक जनतेमध्ये जमीन मालकांमध्ये शासनाच्या दुटप्पी धोरणाबाबत प्रचंड संताप आहे.

जमीन भूसंपादनाच्या नोटिसांना येथील जमीन मालकांनी विरोधाचे लेखी उत्तर देऊनही रिफायनरीची टांगती तलवार येथील भुमिपुत्रांवर शासनाने का ठेवली आहे. त्यामुळे अधिवेशन काळातच शासनाला प्रकल्पाबाबत तीव्र विरोध दर्शविण्यासाठी आंदोलन छेडले आहे.

ग्रामस्थांचा सहभागया आंदोलनात गिर्ये-रामेश्वर व राजापूर-नाणारसह प्रकल्पबाधित गावातील जमीन मालक, ग्रामस्थ बहुसंख्येने सहभागी होणार आहेत. अधिवेशनात विधानभवनामध्ये भाजपचे आमदार सोडून इतर सर्वपक्षीय आमदार रिफायनरी प्रकल्पाविरोधी मत मांडणार असून त्याचवेळी आझाद मैदानावर धरणे आंदोलन सुरु राहणार आहे. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गMumbaiमुंबई