शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

 सिंधुदुर्ग-रत्नागिरी डीएड, बीएडधारक आक्रमक, ठोस निर्णय न झाल्यास उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 16:30 IST

शिक्षक भरतीत स्थानिकांना ७० टक्के आरक्षण मिळालेच पाहिजे, अशी मागणी करीत सिंधुदुर्ग-रत्नागिरी डी.एड्., बी.एड्.धारक संघटनेने शासनाचे लक्ष वेधले. विशेष म्हणजे स्थानिक लोकप्रतिनिधींनी याकडे पाठ फिरविल्याने त्यांच्याविरोधातही येथील तरुणाईने संताप व्यक्त केला.

ठळक मुद्दे सिंधुदुर्ग-रत्नागिरी डीएड, बीएडधारक आक्रमक, ठोस निर्णय न झाल्यास उपोषणआगामी निवडणुकांवर बहिष्काराचा इशारा

सिंधुदुर्गनगरी : न्याय द्या, आम्हांला न्याय द्या... तावडे साहेब न्याय द्या; शाळा आमची पोरा आमची... शिक्षक कित्याक भायलो... अशी गाणी ढोलकीच्या तालावर सादर करीत येथील डी.एड्., बी.एड्.धारकांनी उपोषणाचा दुसरा दिवस गाजवला.

शिक्षक भरतीत स्थानिकांना ७० टक्के आरक्षण मिळालेच पाहिजे, अशी मागणी करीत सिंधुदुर्ग-रत्नागिरी डी.एड्., बी.एड्.धारक संघटनेने शासनाचे लक्ष वेधले. विशेष म्हणजे स्थानिक लोकप्रतिनिधींनी याकडे पाठ फिरविल्याने त्यांच्याविरोधातही येथील तरुणाईने संताप व्यक्त केला.बुधवारी सायंकाळपर्यंत आमच्या मागण्यांबाबत ठोस निर्णय न झाल्यास उपोषण सुरू करून आगामी होणाऱ्या सर्व निवडणुकांवर बहिष्कार घालणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष भिवसेन मसुरकर यांनी दिली.शिक्षक भरतीत स्थानिकांवर वारंवार अन्याय होत आहे. त्यातच शिक्षक भरती परीक्षेत गुण वाढवून देणारे रॅकेट सक्रिय झाले आहे. २०१० सालीही असे रॅकेट कार्यरत असल्याचे पुरावेदेखील पोलिसांकडे देण्यात आले.

मागील आठ वर्षे शिक्षक भरती झाली नसल्याने डी.एड्., बी.एड्.पर्यंतचे शिक्षण घेऊन अनेकजण बेकार झाले. त्यामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, पालघर या जिल्ह्यांमधून स्थानिक शिक्षक भरतीची मागणी जोर धरू लागली आहे.

२०१० साली शिक्षक भरती झाली त्यावेळी विदर्भ, मराठवाड्यातील शिक्षकांचे पुनर्वसन कोकणात करण्यात आले. आताही तेच धोरण रेटले जात असल्याने हा कुटील डाव आम्ही हाणून पाडू, असा इशाराही यावेळी आंदोलकांनी दिला.शासनाचे लक्ष वेधावे यासाठी विविध अन्याय व्यक्त करणारी गाणी उपोषणात सादर करण्यात आली.

उपस्थितांनीही ढोलकीचा ठेका धरीत गाणी सादर करून अन्याय व्यक्त केला. या जन्मात शिक्षक झालो पण पुढच्या जन्मात शिक्षक होणार नाही, अशी व्यथा या गाण्यांमधून मांडण्यात आली. प्रभुदास आसगावकर यांनी गीत गायिले. अक्षय सातार्डेकर यांनी ढोलकी साथ केली.

१४ मे पासून सुरू असलेल्या उपोषणात रणरागिणींचा सहभाग मोठ्या संख्येने आहे. स्थानिकांना न्याय द्या, नाहीतर खुर्च्या खाली करा,आमच्या भावनांशी खेळू नका, असा रोखठोक इशाराही या रणरागिणींनी यावेळी दिला.लोकप्रतिनिधींचे अक्षम्य दुर्लक्षसलग दोन दिवस डी.एड्., बी.एड्.धारकांनी उपोषण केले. परंतु याकडे स्थानिक लोकप्रतिनिधींनी मात्र पाठ फिरविली. निवडणुका आल्या की मते मागायला येणाऱ्या व तरुणाईची बिरुदावली मिरविणाऱ्या नेत्यांना आमच्यावरील अन्यायाचा विसर पडला की काय? असा संतप्त सवाल उपोषणकर्त्यांनी केला. आमचा प्रश्न मार्गी न लावल्यास येथील लोकप्रतिनिधींना त्यांची जागा निवडणुकीत दाखवून देऊ, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

..चिमुकल्यांसह मातांची उपस्थितीशासनाच्या सातत्याने बदलणाऱ्या धोरणाचा फटका तरुणांसह, तरुणींनाही बसला. याचा निषेध करण्यासाठी या उपोषणात आपल्या चिमुकल्यांसह काही माता उपस्थित राहिल्या आहेत. राज्यकर्त्यांनो आता तरी न्याय द्या, अशी आर्त हाक यावेळी त्यांनी दिली. अनेकांचे पालकही या उपोषणात सामील झाले आहेत.

 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गTeacherशिक्षक