शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

सिंधुदुर्ग : राजीव साबळेच निवडून येणार : विनायक राऊत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 15:14 IST

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोकसेवेची नाळ असलेले अ‍ॅड. राजीव साबळे यांना उमेदवारी दिली आहे़ ते चांगल्या मताधिक्याने निवडून येतील, असा विश्वास शिवसेना सचिव तथा खासदार विनायक राऊत यांनी येथे व्यक्त केला़.

ठळक मुद्दे राजीव साबळेच निवडून येणार : विनायक राऊतकणकवलीत शिवसेना पदाधिकारी आढावा बैठक

कणकवली : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोकसेवेची नाळ असलेले अ‍ॅड. राजीव साबळे यांना उमेदवारी दिली आहे़ ते चांगल्या मताधिक्याने निवडून येतील, असा विश्वास शिवसेना सचिव तथा खासदार विनायक राऊत यांनी येथे व्यक्त केला़.कणकवली येथील विजय भवन येथे  शिवसेना पदाधिकारी आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते़. यावेळी शिवसेना उपनेते आमदार उदय सामंत, शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक, उमेदवार अ‍ॅड. राजीव साबळे, संपर्कप्रमुख अरूण दुधवडकर, महिला आघाडी जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत, नगरसेवक सुशांत नाईक, अ‍ॅड. हर्षद गावडे, शैलेश भोगले, मालवण नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर, जिल्हा परिषद गटनेते नागेंद्र परब आदी पदाधिकारी उपस्थित होते़.कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून शिवसेना-भाजपा युतीचे उमेदवार अ‍ॅड. राजीव साबळे रिंगणात उतरले आहेत. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यात केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांच्या उपस्थितीत आढावा बैठका मतदारांसमवेत झाल्या आहेत. १२ वर्षांपूर्वी शिवसेनेचे अनंत तरे या मतदारसंघातून विजयी झाले होते. विनायक राऊत पुढे म्हणाले, शिवसेनेचे उमेदवार अ‍ॅड. राजीव साबळे हे सामाजिक सेवेचे ज्ञान असलेले आणि अभ्यासू लोकप्रतिनिधी आहेत. तीनही जिल्ह्यांमध्ये शिवसेनेची चांगली ताकद आहे़ या ताकदीच्या जोरावर आणि लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने हा विजय शिवसेना संपादन करेल. शिवसेना-भाजपा या विधानपरिषद निवडणुकीसाठी युती करून लढत आहे. प्रत्येकीतीन जागांवर सेना-भाजपा युती लढत आहे.कणकवली नगरपंचायतीच्या स्वीकृत नगरसेवकाबाबत सेना-भाजपमध्ये चर्चा सुरू असून लवकरच एकमताने निर्णय होईल, असे खासदार राऊत यांनी यावेळी स्पष्ट केले़. आमदार उदय सामंत म्हणाले, अ‍ॅड. राजीव साबळे यांचा या निवडणुकीत विजय होणार आहे. शिवसेना-भाजपचे लोकप्रतिनिधी चांगल्याप्रकारे मतदान करतील. त्या दृष्टीने दोन्ही जिल्ह्यांमध्ये प्राथमिक आढावा घेण्यात आला आहे.

ग्रीन रिफायनरी प्रकल्पाला खासदार विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखाली आमदार राजन साळवी यांच्या पुढाकाराने आमचा विरोध आहे. कोकणच्या विकासासाठी शिवसेना कटिबद्ध आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.रिफायनरीला आमचा विरोध : साबळेयावेळी अ‍ॅड. राजीव साबळे म्हणाले, या तीनही जिल्ह्यांमध्ये शिवसेनेची ४५० हून अधिक मते आहेत़. मी पाचवेळा रायगड जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आलेलो आहे. कोकणच्या प्रश्नांबाबत पुढील काळात शिवसेना नेत्यांच्या भूमिकेसोबत आपण राहणार आहे़. प्रस्तावित ग्रीन रिफायनरीला माझा कायम विरोध राहणार आहे.

शिवसेना-भाजप एकत्र लढत असल्यामुळे या निवडणुकीत माझा निश्चितच विजय होईल. खऱ्या अर्थाने कोकणच्या विकासाला चालना देण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्व नेत्यांच्या विश्वासाने मला उमेदवारी दिली आहे़ त्यामुळे खासदार विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखाली कोकणात पुढील काळात काम करीत राहणार आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गVinayak Rautविनायक राऊत Electionनिवडणूक