शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : मुसळेच्या घरावर छापा, गोवा बनावटीचा अवैध दारुसाठा : राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 18:40 IST

गेल्या पाच महिन्यांत गोवा बनावटीच्या अवैध दारुसाठ्यावर तीन मोठ्या कारवाया केल्या असतानाही अवैध दारू विक्रेता चेतन प्रमोद मुसळे याच्या घरावर पुन्हा एकदा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने टाकलेल्या धाडीत तब्बल तीन लाखांची गोवा बनावटीची अवैध दारू हस्तगत केली.

ठळक मुद्देमुसळेच्या घरावर छापा, गोवा बनावटीचा अवैध दारुसाठा राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाईपाच महिन्यांतील चौथी कारवाई

मालवण : गेल्या पाच महिन्यांत गोवा बनावटीच्या अवैध दारुसाठ्यावर तीन मोठ्या कारवाया केल्या असतानाही अवैध दारू विक्रेता चेतन प्रमोद मुसळे याच्या घरावर पुन्हा एकदा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने टाकलेल्या धाडीत तब्बल तीन लाखांची गोवा बनावटीची अवैध दारू हस्तगत केली.

यात विविध दहा प्रकारचा बिअर व दारूसाठा आढळून आला. राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने मंगळवारी मध्यरात्री सुकळवाड येथे आरोपी मुसळेच्या घरावर ही कारवाई केली.अवैध दारुसाठा बाळगणे व विक्री करणेप्रकरणात चेतन मुसळे हा मास्टरमार्इंड बनला आहे. मालवण पोलिसांनी जून महिन्यात दोनवेळा कारवाई करताना तीन लाख रुपयांची तर आॅगस्ट महिन्यात जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांच्या मार्गदर्शनखाली टाकण्यात आलेल्या छाप्यात ३२ हजारांची गोवा बनावटीची अवैध दारू सापडली होती. त्यानंतरही मुसळे याने खुलेआम दारू विक्री सुरू ठेवली.त्यामुळे राज्य उत्पादन शुल्कच्या कुडाळ विभागाने मंगळवारी रात्री तीन लाखांची मोठी कारवाई केली आहे. घरात अवैध दारुसाठा ठेवल्याप्रकरणी उत्पादन शुल्क विभागाने मुंबई दारूबंदी कायद्यान्वये आरोपी चेतन प्रमोद मुसळे (रा. सुकळवाड, ता. मालवण) याच्यावर गुन्हा दाखल करीत मुद्देमालासहीत अटक करण्यात आली, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क कुडाळ विभाग यांनी प्रसिद्धीपत्रकातून दिली आहे.राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्त अश्विनी जोशी, उपआयुक्त संगीता दरेकर यांच्या मार्गदर्शनानुसार अधीक्षक अतुल कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क कुडाळ, कणकवली व निरीक्षक भरारी पथकाने आरोपीच्या घरावर छापा टाकत ही दहा विविध दारूप्रकारात तब्बल ३ लाख ३ हजार ४८० रुपयांची कारवाई केली. याप्रकरणी आरोपीस अटकही करण्यात आली असून अधिक तपास उत्पादन शुल्क विभागाचे कुडाळचे निरीक्षक करीत आहेत.पाच महिन्यांतील चौथी कारवाईसुकळवाड बाजारपेठ येथे राहणाऱ्या चेतन मुसळे याच्या घरावर पोलिसांनी जून महिन्यात दोन वेळा तर जिल्हा पोलिसांनी आॅगस्ट महिन्यात कारवाई केली होती. यात चार लाखांची दारू जप्त करण्यात आली.त्यामुळे शिवसेना पक्षाचा पदाधिकारी असणाऱ्या मुसळेची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. मालवण पोलिसांनी १० जून रोजी सुमारे १ लाख रुपये किमतीची दारू जप्त करून पहिली कारवाई केली होती.त्यानंतर अवघ्या २० दिवसांनी ३० जून रोजी तब्बल २ लाखांहून अधिक किमतीच्या गोवा बनावटीच्या दारूसाठ्यावर छापा टाकला होता. त्यानंतर ५ आॅगस्ट रोजी स्वत: जिल्हा पोलीस अधीक्षकांनी छापा टाकून ३२ हजार रुपयांच्या दारू साठ्यावर कारवाई केली होती. आता १० जानेवारी रोजी ३ लाखांची दारू हस्तगत करण्यात आली.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गExcise Departmentउत्पादन शुल्क विभाग