शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : जनजागृतीअगोदरच नॉन ओव्हन पिशव्यांवर केलेली कारवाई अन्यायकारक : कन्हैया पारकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 17:37 IST

कणकवलीत प्लास्टिक बंदीच्या कारवाईवेळी व्यापाºयांकडून ज्या पिशव्या जप्त करण्यात आल्या त्या बहुतांशी नॉनओव्हन आहेत. या पिशव्यांमध्ये प्लास्टिकचा अंश आहे हे खुद्द व्यापारी बांधवांनाच माहिती नव्हते. त्यामुळे पुरेशी जनजागृती करण्यापूर्वीच नगरपंचायतीने केलेली कारवाई अन्यायकारक आहे. यात व्यापारी बांधवांना नाहक भुर्दंड सहन करावा लागला, अशी भूमिका नगरसेवक कन्हैया पारकर यांनी मांडली.

ठळक मुद्देजनजागृतीअगोदरच नॉन ओव्हन पिशव्यांवर केलेली कारवाई अन्यायकारक : कन्हैया पारकर दिवाळीपर्यंत मुख्याधिकाऱ्यांनी कारवाई करू नये; त्यानंतर प्रशासन व नगरसेवकांनी जनजागृती करावी

सिंधुदुर्ग : कणकवलीत प्लास्टिक बंदीच्या कारवाईवेळी व्यापाºयांकडून ज्या पिशव्या जप्त करण्यात आल्या त्या बहुतांशी नॉनओव्हन आहेत. या पिशव्यांमध्ये प्लास्टिकचा अंश आहे हे खुद्द व्यापारी बांधवांनाच माहिती नव्हते. त्यामुळे पुरेशी जनजागृती करण्यापूर्वीच नगरपंचायतीने केलेली कारवाई अन्यायकारक आहे. यात व्यापारी बांधवांना नाहक भुर्दंड सहन करावा लागला, अशी भूमिका नगरसेवक कन्हैया पारकर यांनी मांडली. कणकवली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते़यावेळी नगरसेवक रुपेश नार्वेकर, माजी नगरसेवक प्रसाद अंधारी, महेश सावंत आदी उपस्थित होते. कन्हैया पारकर म्हणाले, कणकवली शहरात यापूर्वीही आम्ही प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी केली होती. तसेच व्यापाऱ्यांकडील प्लास्टिक जप्तही केले होते. पण गुरुवारी करण्यात आलेली कारवाई चुकीची होती. पूर्वग्रहदूषित आणि सर्वच व्यापारी बांधव चोर आहेत असे समजून त्यांच्या दुकानांवर धाडी टाकल्या जात होत्या. शहराच्या जडणघडणीत व्यापारी हा घटक महत्त्वाचा आहे. असे असताना ऐन दिवाळी सणात अशी कारवाई योग्य म्हणता येणार नाही.प्लास्टिक बंदीची कडक अंमलबजावणी करण्यापूर्वी शहरातील सर्व व्यापाऱ्यांना विश्वासात घेणे आवश्यक होते. पण मुख्याधिकाऱ्यांनी काही मोजक्याच व्यापाऱ्यांना घेऊन बैठक घेतली. त्यात आम्हां लोकप्रतिनिधींनाही बोलाविण्यात आले नाही. तसेच दिवाळी सण आटोपल्यानंतर प्लास्टिक बंदीची कारवाई होणे आवश्यक होते.दंडात्मक कारवाईची रक्कम परत करावी !आम्ही सत्तेत असताना प्लास्टिक बंदी करण्यापूर्वी जनप्रबोधन केले. कार्यशाळा घेतल्या. प्लास्टिकला पर्याय अशा कापडी आणि कागदी पिशव्या वाटल्या. तसेच थेट दंड न करता प्रथम जप्तीची कारवाई केली. पण सध्याचे नगरपंचायत प्रशासन दंडेलशाहीपणे कारवाई करीत आहे. शहरातील व्यापाऱ्याकडे प्लास्टिक पिशव्या नव्हत्या, तर नॉनओव्हन आणि पॉलीप्रॉपीलेन पिशव्या होत्या म्हणून कारवाई झाली आहे. याबाबत झालेली दंडात्मक कारवाईची रक्कम नगरपंचायतीने व्यापाऱ्यांना परत करावी, अशी मागणी कन्हैया पारकर यांनी यावेळी केली.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीsindhudurgसिंधुदुर्ग